शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जलपरीच्या तीन फेऱ्या झाल्या रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2016 23:47 IST

लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़

लातूर : मिरजहून २५ लाख लिटर पाणी घेऊन येणारी जलपरी गेल्या दोन दिवसांपासून लातूरला आली नसल्याने शहरात ५० लाख लिटर पाण्याची तूट निर्माण झाली आहे़ आवक कमी आणि जावक अधिक असल्याने मनपा प्रशासन अडचणीत सापडले आहे़ रविवार व सोमवारी जलपरी आली नसल्याने मनपा प्रशासनाने डोंगरगाव, बेलकुंड येथून टँकरद्वारे जवळपास १२ लाख लिटर पाणी जास्त आणले आहे़ दोन दिवस चोवीस तास टँकर चालणार आहेत़ मंगळवारची शक्यता असली तरी खात्री नसल्याचे सांगण्यात आले़मिरजेतून ज्या वारणेच्या पात्रातून म्हैसाळ योजनेतून लातूरसाठी पाणी उपसले जाते तेथील पाणी संपले आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिका अडचणीत आली आहे़ शनिवारी ५० वॅगन भरुन उशिरा जलपरी आल्याने रविवारचा दिवस पाणी वितरणात कसल्याही प्रकारची अडचण निर्माण झाली नाही़ दरम्यान वारणा नदीच्या पात्रात म्हैसाळ योजनेतून लातूरला पाणी देण्यासाठी आता वारणा धरणातून पाणी सोडण्यात आले आहे. ते पाणी सोमवारी दुपारपर्यंत तरी पोहचले नव्हते़ त्यामुळे रविवार व सोमवार दोन दिवस जलपरी आली नाही़ मंगळवारी सकाळी पाणी पोहचले तर उशिरा का होईना जलपरी लातुरात येणार आहे़ अन्यथा तिसऱ्या दिवशीही मनपा प्रशासनाला पाण्यासाठी स्थानिक स्त्रोतातून अधिक उपसा करावा लागणार आहे़ दोन दिवस जलपरी आली नसल्याने जवळपास ५० लाख लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे़ अचानक तूट निर्माण झाल्याने मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी रविवारी २४ तास टँकर चालविण्याचे आदेश बजावले़ त्यानुसार डोंगरगाव व बेलकुंड येथून ३०० टँकर पाणी आणण्यात आले आहे़ परिणामी, पाणी वितरणात फारसा परिणाम झाला नसला तरी मनपाकडे ठेवण्यात आलेले राखीव ५ ते १० लाख लिटर पाणी आता संपले आहे़ मंगळवारी जलपरी न आल्यास मात्र काहीसा तुटवडा निर्माण होऊ शकतो, अशी शक्यता मनपा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे़ डोंगरगाव, बेलकुंडच्या फेऱ्या वाढल्या...लातूर शहराला डोंगरगावातून दररोज १५ लाख लिटर आणि माकणी धरणातून दररोज ३५ लाख लिटर पाणी उचलले जाते. रेल्वेचे पाणी बंद झाल्यामुळे टँकरच्या फेऱ्यात वाढ करण्यात आली आहे़ एरवी २०० ते २२५ टँकरच्या फेऱ्या होत होत्या, रेल्वेचे पाणी बंद झाल्याने ३०० फेऱ्या करण्यात आल्या आहेत़ यातून १० ते १२ लाख लिटर पाणी अधिक घेतले आहे़ शनिवारी उशिरा आलेल्या जलपरीचे पाणी रविवारी वितरण करण्यात आले़ सोमवारी स्थानिक स्त्रोतातून पाण्याचे संकलन वाढविण्यात आले असले तरी २५ लाख लिटरची तूट भरून काढणे शक्य नसल्याने मनपा अडचणीत सापडली आहे़ मंगळवारी प्रशासनाची धावपळ होणार आहे़ आता शिल्लक साठा नाही : आयुक्त सुधाकर तेलंगमिरजहून दोन दिवसांपासून जलपरी आली नाही़ परिणामी, ५० लाख लिटर पाणी कमी झाले आहे़ शनिवारी सायंकाळी जलपरी आल्याने रविवारी पाणी वितरणात अडचण निर्माण झाली नाही़ सोमवारीही रेल्वे येणार नसल्याची शक्यता लक्षात घेऊन डोंगरगाव व बेलकुंड येथून दररोज २०० ते २२० फेऱ्या व्हायच्या़ रविवारी टँकरच्या फेऱ्या वाढविण्यात आल्याने ३०० फेऱ्या झाल्या आहेत़ २४ तास टँकरने पाणी घेण्यात आले असून जवळपास १२ लाख लिटर पाणी अधिक आले आहे़ मंगळवारी रेल्वे येऊ शकते, जर आलीच नाही तर काही प्रमाणात शहरात तुटवडा निर्माण होईल़ बुधवारी मात्र रेल्वे येणार असून पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे मनपा आयुक्त सुधाकर तेलंग यांनी सांगितले़