शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

खुनाच्या संशयावरून तीन परप्रांतीय ताब्यात

By admin | Updated: July 8, 2014 00:37 IST

हिंगोली : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरच्या २५ वर्षीय चालकाचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शिवारात ६ जुलैच्या रात्री संशयास्पदरित्या मृत्यू झाला

हिंगोली : दिल्लीहून हैदराबादकडे निघालेल्या कंटेनरच्या २५ वर्षीय चालकाचा बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर शिवारात ६ जुलैच्या रात्री संशयास्पदरित्या मृत्यू झाला असून या प्रकरणी सोमवारी दुपारी तीन परप्रांतियांना हिंगोलीत ताब्यात घेण्यात आले. त्यांना बुलडाणा पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक शंकर सिटीकर यांनी दिली. हिंगोली शहरातील बळसोंड भागात सोमवारी दुपारी सापळा रचून स्थागुशाच्या पथकाने कंटेनर चालक करणसिंग धरमपाल कुलहरी (वय ४० रा. खेचोली, ता. बुहाणा, जि. झुंझुनू, राजस्थान), विकासकुमार श्रीगुटाराम बाहेल (वय ३५, रा. गवळीजाट, ता. नारनौर, जि. महेंद्रगड हरियाणा), सुनील रामजीलाल शर्मा (३८,रा. खेचोली ता. बुहाणा जि. झुंझुनू राजस्थान ) या तिघांना संशयावरून ताब्यात घेतले. ते सर्वजण दोन कंटेनरमध्ये सिमेंटचे मिक्श्चर घेऊन दिल्लीहून हैदराबादकडे निघाले होते. बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत विकास सैतास कुलेहरी (२५, रा. खेचोली ता. बुहाणा जि. झुंझुनू राजस्थान) हा युवक अचानक बेपत्ता झाल्याची माहिती हिंगोली पोलिसांना देण्यात आली आहे. विशेष म्हणजे त्याच्या सोबतचे तिघेजण आपल्या कंटेनरसह पुढे निघून गेल्याचे सांगण्यात आले. त्यांना ताब्यात घेण्याचे निर्देश बुलडाणा पोलिसांकडून मिळाल्याने हिंगोलीत ही कारवाई करण्यात आली. अचानक बेपत्ता झालेल्या युवकाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी कळवले असून हा खुनाचा प्रकार असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने हिंगोलीत पकडलेल्या तिघांकडून महत्वाची माहिती मिळू शकेल, असेही पोनि सिटीकर यांनी सांगितले आहे. (प्रतिनिधी)