शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
अमेरिकेने अणुकेंद्रांवर केलेल्या हल्ल्याचा इराण कसा घेणार बदला, केवळ इस्राइललाच लक्ष्य करणार की...
3
भगवे झेंडे घेऊन रस्त्यावर उतरणे म्हणजे हिंदुत्व नव्हे; नितीन गडकरींची भूमिका
4
अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण संतापला; इस्रायलवर डागली 30 क्षेपणास्त्रे, अनेक शहरांमध्ये भीतीचे वातावरण
5
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
6
"जंगल का कानून..."; अणुकेंद्रांवरीर हल्ल्यानंतर, इराणचा भारतमार्गे अमेरिकेला 'मेसेज'; घेतली मोठी शपथ!
7
इस्रायल सोडा अमेरिका-युरोपलाही घाबरत नाही; पण 'या' गटासमोर इराणला झुकावेच लागते!
8
‘त्या’ बेकायदा कृत्यांमध्ये कायद्याचे रक्षकच सहभागी; वसई-विरारमधील बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले
9
इराणच्या अणुकेंद्रांवर अमेरिकेने टाकलेले बंकर बस्टर बॉम्ब एवढे आहेत विध्वंसक, अशी आहेत त्यांची वैशिष्ट्ये
10
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
11
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
12
Maharashtra Rainfall: पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पाऊस, विदर्भात अजून प्रतीक्षा
13
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
14
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
15
अलिबाग: खांदेरीवर ‘मंकला’, ‘वाघबकरी’ खेळांचे अवशेष; शोधमोहिमेत सापडले मंकलाचे १० पट
16
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
17
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
18
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
19
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
20
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा

मोकाट कुत्रे पकडण्यासाठी तीन संस्थांची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2018 17:57 IST

प्रशासनाने मागविलेल्या निविदांना प्रतिसाद देत तीन संस्थांनी कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी प्रशासनाकडून प्राप्त निविदा उघडून एक निविदा मंजूर करण्यात येणार आहे.

वाळूज महानगर : कुत्र्याच्या वाढत्या उपद्रवामुळे सिडको प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाने मागविलेल्या निविदांना प्रतिसाद देत तीन संस्थांनी कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी प्रशासनाकडून प्राप्त निविदा उघडून एक निविदा मंजूर करण्यात येणार आहे.

सिडको वाळूज महानगरात दिवसेंदिवस मोकाट कुत्र्यांचा उपद्रव वाढत आहे. दिवसभर नागरी वसाहतीत फिरणारे कुत्रे रात्रीच्या वेळी मुख्य रस्त्यावर घोळक्याने ठाण मांडत आहेत. नागरिकांना चावा घेण्यासाठी धावून जात असून, वाहनधारकांचा पाठलाग करीत आहेत. साईनगर, देवगिरीनगर, सीतानगर भागातील अनेक लहान मुलांसह नागरिकांचे कुत्र्यांनी लचके तोडल्याच्या घटना घडल्या आहेत. शिवाय अपघातासही कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे संपूर्ण सिडको वाळूज महानगरासह परिसरात मोकाट कुत्र्याची दशहत पसरली आहे. मोकाट कुत्र्यांचा उपद्रव अधिक वाढल्याने सिडको प्रशासनाने कुत्र्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

याच अनुषंगाने प्रशासनाने २२ नोव्हेंबर रोजी कुत्रे पकडून निर्बिजीकरण करण्यासाठी निविदा काढून ३ डिसेंबर पर्यंत इच्छुकांकडून अर्ज मागविले होते. दिलेल्या मुदतीत कमी अर्ज आल्याने प्रशासनाने पुन्हा ११ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली. या मुदतीत बीड, अंबरनाथ व डोंबिवली येथील एकूण तीन संस्थांनी प्रशासनाकडे अर्ज केले आहेत. यात कुत्रे पकडून त्यांच्यावर निर्बिजीकरण शस्त्रक्रिया करुन खाज प्रतिबंधक इंजेक्शन दिले जाणार आहे. तसेच अँटीरेबिज लस देवून एडब्ल्युबीआय नियमानुसार त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत.

सोमवारी निर्णय घेणारसिडकोने कुत्रे पकडून निर्बिजीकरण करण्यासाठी काढलेल्या निविदेला प्रतिसाद देत तीन संस्थांनी अर्ज केले आहेत. बीड जिल्हा केज येथील युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेलफेअर सो., मुंबई डोंबिवली येथील पार्थ प्रतिष्ठाण व अंबरनाथ येथील अ‍ॅनिमल वेलफेअर सो. या तीन संस्थांनी सिडको प्रशासनाकडे कुत्रे पकडण्याची तयारी दर्शविली आहे. सोमवारी निविदा उघडून एकाची निवड केली जाणार असल्याची माहिती सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी दिली आहे.----------------------------------------

टॅग्स :Walujवाळूज