शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
3
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
4
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
5
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
6
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
7
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
8
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
9
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
10
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
11
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
12
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
13
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
14
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
15
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
16
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
17
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
18
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
19
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
20
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...

तीन ‘मुन्नाभार्इं’ना अटक

By admin | Updated: April 12, 2016 00:41 IST

औरंगाबाद : संजय दत्तच्या गाजलेल्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये दाखविण्यात आलेल्या कॉपीच्या प्रसंगाचीच ‘कॉपी’ करून जवान बनू पाहणाऱ्या तिघांना

औरंगाबाद : संजय दत्तच्या गाजलेल्या मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये दाखविण्यात आलेल्या कॉपीच्या प्रसंगाचीच ‘कॉपी’ करून जवान बनू पाहणाऱ्या तिघांना सोमवारी सकाळी सातारा परिसरातील भारत बटालियनमध्ये भरती परीक्षेच्या वेळी रंगेहाथ पकडण्यात आले. यातील दोघे आपल्या बनियनच्या शिलाईमधून मायक्रोफोनची वायरिंग करून मोबाईलच्या आधारे कॉपी करण्याच्या प्रयत्नात होते, तर तिसरा आपला ‘ढ’ भाऊ उत्तीर्ण व्हावा म्हणून त्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी बसला होता. आरोपींमध्ये मदन कपूरचंद गुसिंगे (२२, रा. कौचलवाडी, अंबड, जालना), विजयसिंग रतनसिंग जारवाल (२४, रा. हुसैनपूर, पैठण) व जीवन गोविंद जरावंडे (१९, रा. कौचलवाडी, अंबड) यांचा समावेश आहे. तिघांना सातारा पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, सध्या सातारा परिसरातील भारत बटालियनमध्ये ४४ जवान पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. नुकतीच शारीरिक चाचणी पार पाडली. त्यात उत्तीर्ण झालेल्या ८६९ उमेदवारांची लेखी परीक्षा सोमवारी ठेवण्यात आली होती. सकाळी आठ वाजेच्या सुमारास परीक्षा सुरू होणार होती. तत्पूर्वी परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी हॉलमध्ये बसवलेल्या उमेदवारांची कसून अंगझडती सुरू करण्यात आली. अंगझडतीच्या वेळी आरोपी मदन गुसिंगे याचा नंबर आला तेव्हा तो गांगरला. त्यामुळे तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्याला त्याचा संशय आला. त्याची बारकाईने तपासणी केली. तेव्हा बनियनमध्ये वायरसारखे काही तरी त्यांच्या हाताला लागले. मग त्याला बनियन काढण्यास सांगण्यात आले. बनियन काढताच त्याचे बिंग फुटले. त्याच्या बनियनमध्ये मोबाईल, मायक्रोफोन आढळून आला. कॉपी करण्यासाठी बनियनमध्ये हे साहित्य त्याने दडवून ठेवले होते. लगेच त्याला पकडून बाजूला करण्यात आले. असेच आणखीही काही ‘मुन्नाभाई’ असू शकतात, असा संशय आल्याने सर्वच उमेदवारांची आणखी अत्यंत बारकाईने झडती घेण्यात आली. त्यात विजयसिंग जारवाल या उमेदवारानेही कॉपीसाठी मदनच्या कॉपी करण्याच्या पद्धतीचीच ‘कॉपी’ केलेली आढळून आली. विजयसिंगनेही स्वत:च्या बनियनच्या शिलाईत वायरिंग करून मोबाईल दडविलेला आढळून आला. डमी परीक्षार्थीही सापडलाजारवाल आणि गुसिंगे हे दोन हायटेक कॉपीबहाद्दर पकडल्यानंतर सर्व परीक्षार्थींच्या कागदपत्रांचीही बारकाईने तपासणी करण्यात आली. तेव्हा पवन गोविंद जरावंडे या परीक्षार्थीच्या प्रवेशपत्राबाबत अधिकाऱ्यांना संशय आला. त्याला मग ‘खाक्या’ दाखविताच त्यानेही तोंड उघडले. परीक्षा देणाऱ्या या तरुणाचे नाव जीवन गोविंद जरावंडे (१९, रा. कौचलवाडी) असे असल्याचे समोर आले. त्याचा ‘ढ’ भाऊ पवन जरावंडेच्या नावावर तो परीक्षा देत होता. पवन हा शारीरिक चाचणीत उत्तीर्ण झाला होता; परंतु लेखी परीक्षेत आपण उत्तीर्ण होऊ, याची त्याला खात्री नव्हती. म्हणून भावाला उत्तीर्ण करण्यासाठी जीवन ‘तयारीनिशी’ त्याच्या नावावर परीक्षा देण्यासाठी आला होता. चौघांविरुद्ध सातारा ठाण्यात गुन्हाहायटेक कॉपीच्या प्रयत्नात असलेल्या मदन गुसिंगे, विजयसिंग जारवाल या दोघांसह पवन जरावंडे आणि त्याच्या नावावर परीक्षा देणारा त्याचा भाऊ जीवन या चौघांविरुद्ध निरीक्षक फकीरचंद घुगे यांच्या फिर्यादीवरून सातारा ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. यातील पवन जरावंडे वगळता तिन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. आरोपी जारवाल आणि गुसिंगे या दोघांनी कॉपी करण्यासाठी एकमेकांच्या पद्धतीचीही ‘कॉपी’ केलेली होती. गाजलेल्या मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटात संजय दत्त परीक्षेत जसा मोबाईलचा वापर करीत कॉपी करतो, तीच पद्धत या दोघांनी अवलंबिली होती. दोघांनी काळ्या रंगाची सारखीच बनियन घातलेली होती. ४बनियनच्या शिलाईमध्ये मायक्रोफोनची वायरिंग केलेली होती. बनियनमध्येच दोघांनी मोबाईल दडविलेला होता. हाती प्रश्नपत्रिका पडताच ती मोबाईलच्या कॅमेऱ्याने स्कॅन करून बाहेर असलेल्या साथीदाराला पाठवायची. मग बाहेरचा साथीदार गाईडमधून उत्तरे शोधून मोबाईलद्वारे या आरोपींना उत्तरे सांगणार.४ ही उत्तरे परीक्षार्थी आरोपी बनियनमध्ये दडविलेल्या मायक्रोहेड फोनद्वारे ऐकून उत्तरपत्रिकेत लिहिणार, अशी ही पद्धत होती. हे भारत बटालियनच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे या दोन्ही मुन्नाभार्इंचा डाव उधळला. अन्यथा या परीक्षेचा पेपरच फुटला असता.