शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

डेंग्यूचे आणखी तीन संशयित रुग्ण रुग्णालयात दाखल...!

By admin | Updated: August 25, 2016 00:54 IST

जालना : डेग्यूच्या तापेने बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील सतरा वर्षीय अर्चना बबन चंद आणि सेवली येथील अकरा वर्षीय शारदा बबन बोरूडे या दोघींचा डेग्यू तापेने मृत्यू झाला होता.

जालना : डेग्यूच्या तापेने बदनापूर तालुक्यातील मांडवा येथील सतरा वर्षीय अर्चना बबन चंद आणि सेवली येथील अकरा वर्षीय शारदा बबन बोरूडे या दोघींचा डेग्यू तापेने मृत्यू झाला होता. त्यातच बुधवारी आणखी तीन संशयित रुग्ण आढळून आले असून जाफराबाद तालुक्यातील अकोला देव, घनसावंगी तालुक्यातील मूर्ती आणि जालना तालुक्यातील काकडा येथील तिघांचा समावेश आहे. त्यांच्यावर जालना शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली.दीड महिन्यात जिल्ह्यात तापेचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. पैकी पाच जणांना डेंग्यू लागण होऊन दोघींना जीव गमवावा लागला आहे. तर तिघांची प्रकृती गंभीर असतानाच बुधवारी आणखी तीन संशयित रुग्ण आढळून आले आहेत. या घटनेने खडबडून जागे झालेल्या आरोग्य विभागाने खबरदारी म्हणून पथक स्थापन केले. या पथकाने मंगळवारी आणि बुधवारी दोन दिवस मांडवा आणि भोकरदन तालुक्यातील पारध येथे गावाला भेटी देवून गावातील तापेने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या रक्ताचे नमुने संकलित केले. हे नमुने औरंगाबाद येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. जालना तालुक्यातील सेवली, बदनापूर तालुक्यातील मांडवा आणि अंबड तालुक्यातील एकनाथनगर भोकरदन तालुक्यातील पारध आदी ठिकाणी तापेचे रुग्ण आढळून येत आहे. वातावरणात झालेला बदल आणि गेल्या वीस दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने साचलेल्या पाण्याच्या डबक्यात डासांचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने डासांचे प्रमाण वाढले आहे. परिणामी तापेच्या रुग्णाची वाढ होत असल्याचे आरोग्य विभागाचे मलेरीया अधिकारी श्याम गावंडे म्हणाले. त्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने गावात डास होऊ नयेत म्हणून जनजागृती करण्यात येत आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या मदतीने गावातील औषधीची फवारणी ,गावात धुरफवारणी केली जात आहे.