बीड : तालुक्यातील चौसाळ्याजवळ एका कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तीन ठार तर दोन जखमी झाल्याची घटना मंगळवारी आठच्या सुमारास घडली. जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आंध्रप्रदेश राज्यातील पाचजण एका कारमधुन बीडच्या दिशेने येत होती. चौसाळ्यानजीक त्यांची कार (एपी-२८ एम-६९७०) ला अज्ञात वाहनाने जोराची धडक देऊन निघुन गेला. या अपघातातील जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तीन जण मयत झाले असल्याचे डॉक्टरांनी घोषीत केले तर इतर दोघांवर उपचार सुरु आहेत. समोरील वाहनाने ऐवढ्या जाराची धडक दिली की अर्ध्याहुन अधिकभाग दबुन गेला होता. मयत परराज्यातील असल्याने त्यांची ओळख पटली नाही. त्यांच्या सोबतचे दोघे जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)
कार अपघातात तीन ठार, दोन जखमी
By admin | Updated: December 30, 2015 00:42 IST