शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

आंतरराज्यीय तीन गुन्हेगार जाळ्यात

By admin | Updated: June 25, 2014 01:28 IST

औरंगाबाद/ वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील मण्णपूरम बँकेवर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली.

औरंगाबाद/ वाळूज महानगर : वाळूज औद्योगिक परिसरातील मण्णपूरम बँकेवर दरोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गुन्हे शाखेच्या पथकांनी अटक केली. या टोळीकडून वाळूज परिसरातील अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांनी व्यक्त केली आहे.सोपान ओपीन पिंपळे, बाळा यमगर पिंपळे, बाळ्या महादेव सोळंकी या तीन दरोडेखोरांना अटक करण्यात आली असून, कान्या ऊर्फ करण सोळंकी याला ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून, त्यालाही रात्रीच अटक केली जाईल, असे निरीक्षक आघाव यांनी सांगितले. सोमवारी पहाटे वाळूज औद्योगिक वसाहतीतील मण्णपूरम बँकेसह परिसरातील ६ दुकाने या टोळीने फोडली होती. २४ तासांच्या आत दरोडेखोरांची टोळी गजाआड करण्यात गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले. पोलीस आयुक्त राजेंद्र सिंह यांनी या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेचे निरीक्षक अविनाश आघाव यांच्याकडे सोपविला. त्यानुसार आघाव यांनी स्वत:बरोबर निरीक्षक गौतम पातारे, शिवा ठाकरे, सहायक निरीक्षक उन्मेष थिटे, उपनिरीक्षक अजयकुमार पांडे, सुभाष खंडागळे यांची पथके दरोडेखोरांच्या मागावर लावली. पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज तपासल्यानंतर दरोडेखोरांच्या तपासाची दिशा ठरविली. या दरोडेखोरांनी मध्यप्रदेश येथील काही अट्टल गुन्हेगारांना औरंगाबादेत बोलावून घेतले होते. कालच्या गुन्ह्यात त्यांचा समावेश होता. आणखी ६ दरोडेखोरांच्या मागावर गुन्हे शाखेचे पोलीस आहेत.दरोडेखोरांनी कामगार चौकातून २ लाखांचे स्पेअर पार्ट, तर पंढरपुरात २० हजारांची रोकड पळविली. दरोडेखोरांनी दोन सुरक्षारक्षकांना बेदम मारहाण करून ६ दुकानेही फोडली होती. सोने तारण ठेवणाऱ्या मण्णपूरम बँकेची तिजोरी फोडण्यास दरोडेखोरांना अपयश आल्यामुळे तब्बल दोन कोटी रुपयांचे सोने लुटण्याचा प्रयत्न फसला होता. या घटनेनंतर वाळूज औद्योगिक परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सुरुवातीला पाच संशयित आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले. संशयितांची आज दिवसभर कसून चौकशी करण्यात आली. पोलिसांचा अजब तपासदरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, दरोडेखोरांचे फुटेज ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले. या फुटेज (फोटो) मुळेच दरोडेखोर फरार झाल्याचा अजब जावई शोध एमआयडीसी वाळूज पोलिसांनी लावला आहे. दरोडाप्रकरणी प्रसिद्धीमाध्यमांच्या प्रतिनिधींना अधिक माहिती सांगण्यास पोलिसांनी टाळाटाळ केली.