शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

टी.व्ही. स्फोटात तीन जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 01:03 IST

टी.व्ही.समोर बसून कार्यक्रम पाहणे एकाच कुटुंबातील तीन जणांना चांगलेच महागात पडले. टी.व्ही.चा अचानक स्फोट झाल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : टी.व्ही.समोर बसून कार्यक्रम पाहणे एकाच कुटुंबातील तीन जणांना चांगलेच महागात पडले. टी.व्ही.चा अचानक स्फोट झाल्याने त्यांना किरकोळ जखमा झाल्या. ही घटना मुकुंदवाडीतील इंदिरानगर येथे गुरुवारी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली.शिवाजी नारायण लंके (वय ५६), सुमन शिवाजी लंके (४५) आणि रमेश शिवाजी लंके (२७) अशी जखमींची नावे आहेत. याविषयी प्राप्त माहिती अशी की, मुकुंदवाडी परिसरातील अनेक घरांना गुरुवारी सकाळपासून कमी-जास्त दाबाने वीजपुरवठा सुरू होता. याबाबत रहिवाशांनी महावितरणच्या स्थानिक कार्यालयाकडे फोन करून तक्रार केली होती. मात्र, वीजपुरवठ्याच्या गुणवत्तेत सुधारणा झाली नव्हती. दरम्यान, गुरुवारी रात्री लंके कुटुंब घरातील टी.व्ही.वर प्रोगाम पाहत बसले होते. यावेळी अचानक टी.व्ही.तून स्फोटासारखा आवाज झाला आणि टी.व्ही.ची पिक्चर ट्यूब फुटून उडाली. यावेळी टी.व्ही.समोर असलेल्या शिवाजी, सुमन आणि रमेश यांना पिक्चर ट्यूबच्या काचा आणि गरम प्लास्टिक उडून लागले. यात तिघांनाही किरकोळ जखमा झाल्या. एका जणाच्या डोक्याला तर दुसºयाच्या पायाला जखम झाली आणि सुमन यांनाही भाजले. या घटनेनंतर त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. पोलिसांत मात्र या घटनेची नोंद करण्यात आलेली नाही. पोलिसांनी या घटनेचा दुजोरा दिला नाही.