शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

शवविच्छेदनामुळे सापडले तीन नराधम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:42 IST

बर्दापूर : आई-वडील वीटभट्टीवर कामाला होते. याच वीटभट्टीवरील कामगारांनी अल्पवयीन मुलीला शिकार बनवीत अत्याचार केला.

लोकमत न्यूज नेटवर्कबर्दापूर : आई-वडील वीटभट्टीवर कामाला होते. याच वीटभट्टीवरील कामगारांनी अल्पवयीन मुलीला शिकार बनवीत अत्याचार केला. सदर मुलीने आत्महत्या केली. शवविच्छेदन केल्यानंतर तिच्या पोटात गर्भ आढळला. त्यानंतर बलात्काराचे रहस्य उलगडले अन् तीन नराधमांविरुद्ध बर्दापूर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.दत्ता अनुरथ रोडे, धनंजय रोडे (रा. कन्हेरवाडी, ता. परळी) व सौदागर दत्तात्रय नरसे (रा. अंबाजोगाई) अशी या नराधमांची नावे आहेत. पीडित मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत गिरवली येथे राहत होती. आई-वडील वीटभट्टीवर काम करतात. परिस्थितीमुळे पीडित मुलगीही त्यांना अधूनमधून कामात मदत करायची. याच वीटभट्टीवर अनेक कामगार कामाला होते. येथील काही नराधमांनी पीडितेला शिकार बनवीत जाळ्यात ओढले. १ मार्च ते ११ जुलैदरम्यान तिच्यावर ठिकठिकाणी नेऊन अत्याचार करण्यात आला. १२ जुलै रोजी पीडितेने आत्महत्या केली. या प्रकरणी बर्दापूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद झाली होती.दरम्यान, आत्महत्येनंतर पीडितेचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यात तिच्या पोटात डॉक्टरांना गर्भ आढळून आला. त्यानंतर खळबळ उडाली. पीडितेच्या वडिलांनी बर्दापूर पोलीस ठाण्यात धाव घेत गुरुवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. पोलीस उपअधीक्षक विशाल आनंद या घटनेचा तपास करीत आहेत.