शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

साडेतीन कोटींचा गंडा

By admin | Updated: August 1, 2014 01:06 IST

हदगाव : तालुक्यातील मरडगा हे गाव कळमनुरी व हदगावच्या सिमारेषेवरील असलेले ३ हजार वस्तीचे गाव.

हदगाव : तालुक्यातील मरडगा हे गाव कळमनुरी व हदगावच्या सिमारेषेवरील असलेले ३ हजार वस्तीचे गाव. या गावातील सर्वच स्तरातील लोकांनी सुपर पॉवर केबीसी व कॅझाल या कंपनीत दाम दुप्पटीच्या आमिषाला बळी पडून ३ कोटी ४५ लक्ष रुपये गुंतवणूक केली आहे. यामुळे निराशेच्या काळोखात सध्या हे गाव बुडाले असून सर्वत्र याचविषयी चर्चा सुरू आहे. सध्या राज्यात गाजत असलेल्या केबीसी व सुपरपॉवर या नातेवाईकाच्या असलेल्या कंपनीच्या आमिषाला हदगाव तालुकयातील मरडगा, आमगव्हाण, मार्लेगाव व नेवरी ही गावे बळी पडली आहेत. परंतु सर्वात जास्त गुंतवणूक मरड्याच्या ग्रामस्थांनी केली आहे. अंगणवाडी मदतनिस पासून मानकऱ्यापर्यंत सर्वच लोकांनी ३० महिन्यात टाकलेल्या रक्कमेच्या दुप्पट पैसे मिळणार म्हणून गुंतवणूक केली. परभणी शहरात याचे मुख्य कार्यालय सांगून गावातील सरपंच, तंटामुक्त अध्यक्ष व प्रतिष्ठीत मंडळी या कंपनीच्या गळाला लागले. त्यांनी एजन्ट म्हणून काम केले. जास्तीत जास्त एकाच वेळी ७ लाख रुपये मानकऱ्यांनी गुंतवणूक केली आहे तर कमीत कमी १५ हजार ५४० रुपयाची गुंतवणूक मजूरदारांनी केली आहे. एकमेकाच बघून घरातील धान्य विकून अंगावरील दागिणे तर काहींनी विमा कंपनीच्या पॉलीसी मोडून या कंपनीत भरले.काही लोकांना याचे आश्चर्य वाटले. परंतु सर्व गावच कस बुडणार एवढे मोठ-मोठे माणस ७ लाख ५ लाख रुपये टाकतात तर आपले १५ हजार ३० हजार कसे बुडणार असा सल्ला देऊन एजंटांनी अख्ख गाव आर्थिक अंधाराच्या खाईत घातले.३ हजार लोकवस्तीचं छोटस गाव प्रत्येक घरात २ किंवा ४ सदस्यांनी रक्कम भरलेली आहे. १ कोटी २७ लाख केबीसी २ कोटी सुपर पावर तर ८ लाख कॅझाल कंपनीत गुंतवणूक केली आहे. या कंपनीने दिलेले बोनसचे चेक वटत नसल्याने सहा महिन्यापूर्वी काही नागरिकांनी निवघा चौकी व हदगाव पोलिस स्टेशनला तक्रर दिली होती. परंतु हातावर अर्ज ठेऊन संबंधित एजंटांना भेटून प्रकरण दाबण्यात आल्याची प्रतिक्रिया सुमनबाई काळे यांनी दिली.पंजाब नरवाडे १ लाख ५५ हजार ४००, कुसुम खंदारे ५० हजार, सुमनबाई काळे ३ लाख ३ हजार, सुनील नरवाडे १५ हजार ५४०, गजानन नरवाडे ३ लाख ६४ हजार, रामा नरवाडे १५ हजार ५४०, किशन नरवाडे १ लाख ९५ हजार, विमलबाई थोरात ७७ हजार, मानकरी लक्ष्मणराव ७ लाख, कृष्णकुमार काळे ६५ हजार, राजुपाल काळे १५ हजार ५४०, परसराम काळे १७ हजार, सुधाकर कोकरे १७ हजार, गणपत नरवाडे ३४ हजार, दाताराव काळे ३३ हजार, राजू नरवाडे ३१ हजार ५४०, सुरेश नरवाडे २२ हजार ५०० अशी पाच पानाची यादीच आहे. एकूण १७०० लोकांची फसवणूक झाली आहे. (वार्ताहर).शेतात राबणाऱ्यांना फटका गुंतवणूकदारांना २५५० रुपये व्याजापोटी ३ महिन्याच्या अंतराचे ६-४ चेकही देण्यात आले. ७५ हजार रुपये टाकणाऱ्या ग्राहकाला दीड लाखाचा चेक २१ सप्टेंबर २०१४ या तारखीचा देण्यात आलेला आहे. गावातील गजानन बापुराव काळे, जर्नार्धन काळे, ज्ञानेश्वर सोमाजी काळे, पद्माकर पांडुरंग काळे व अन्य या कंपनीचे एजंट झाले. या लोकांनी भरमसाठ कमाई केली, सायकल घेण्याची ऐपत नसणारे आज मार्शल गाड्यांनी फिरत आहेत. काहींनी नांदेड शहरात टोलेजंग इमारती बांधल्या. परंतु गावातील रोज मजुरी करणारे, वर्ष-वर्ष काबाडकष्ट करुन शेतीत राबणारे काडीमोड झाले.