शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत आधीच मुसळधार पाऊस, त्यात भूकंपाचे धक्के; १० सेकंद जमीन हादरली, लोक घराबाहेर पळाले
2
कर्नाटकात हालचालींना वेग मुख्यमंत्री बदलणार की बंडखोरी होणार? दोन्ही नेते दिल्लीत पोहोचले; राहुल गांधी निर्णय घेणार
3
गजब होई गवा! महिलेच्या व्होटर आयडीवर छापला बिहारी मुख्यमंत्र्यांचा फोटो; पती म्हणतोय... 
4
भलेही ताकद कमी असेल, पण इरादा पक्का! 'हा' छोटासा देश थेट चीनशी लढण्याच्या तयारीत
5
तीन हजारांवर काॅटेज, हाॅटेलमध्ये ‘सर्च ऑपरेशन’; संशयास्पद ‘बोटी’च्या संदेशानंतर पोलिस ‘अलर्ट’
6
माल्ल्या, नीरव मोदी, पारेख... सर्वांना एकत्र करा; त्यापेक्षाही मोठा आहे जेन स्ट्रीट घोटाळा, अवाक् करणारा दावा
7
फेसबुक लाईव्हवर व्यथा सांगितली अन् १५ मिनिटांत संपवलं जीवन! रिअल इस्टेट व्यावसायिकानं का उचललं टोकाचं पाऊल? 
8
कंगाल पाकिस्तानबद्दल काय म्हणावं? पाकिस्तानची सरकारी एअरलाईन्स खरेदी करण्यासाठी आले सीमेंटवाले
9
पुढील काही महिने पृथ्वी वेगाने फिरणार; भविष्यात घड्याळाची वेळ बदलावी लागणार, ९ जुलैला काय घडलं?
10
रात्री ज्याला चोर म्हणून तुडवला, त्यालाच सकाळी जावई बनवला! रात्रभरात असं नेमकं घडलं काय? 
11
आजचे राशीभविष्य: या राशींसाठी लग्न जुळण्याचा योग, व्यापार - व्यवसायात फायदा होणार, चांगला दिवस
12
हातात हात अन् प्रेग्नंट पत्नीला साथ! शूराची काळजी घेताना दिसला अरबाज खान, व्हिडीओ व्हायरल
13
समलैंगिक संबंध, ब्लॅकमेलिंग अन् शेवट...; मुंबईतील ३ घटना, ३ मृत्यू, नेमकं काय घडले?
14
५० लाख नागरिकांना मिळणार जागेची मालकी; तुकडेबंदी कायदा तूर्त शिथिल, नंतर रद्द करणार
15
...तर खराब रस्त्यांसाठी नागरिकांनी या आमदारांना का मारू नये?; टॉवेल बनियनवर गावगुंडासारखा राडा
16
विद्यार्थिनींची अंतर्वस्त्रे उतरवली, कारण...; शहापूरच्या खासगी शाळेतील अत्यंत घृणास्पद प्रकार
17
सोळावं वरीस धोक्याचं... किशोरवयातच प्रौढपण; खेळण्याच्या वयात मुली पडतायेत वासनेचा बळी
18
मतदारांच्या कमाल संख्येनुसार मतदान केंद्रे; निवडणूक आयोगाचे निर्देश, एका इमारतीत आता १० केंद्रे
19
पंढरीचे ‘एआय’ वारकरी! AI ने केली २७ लाख लोकांची गर्दी मोजण्याची किमया
20
निवडणूक आयोग जनतेला मूर्ख समजतो की काय?; रोखठोक प्रश्न विचारणं आवश्यक बनलंय

पैठणमध्ये तीन कोटींची वाळू जप्त

By admin | Updated: June 30, 2014 01:04 IST

पैठण : नगर जिल्ह्याची हद्द सोडून पैठण तालुक्याच्या हद्दीत गोदावरीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या नगरच्या ठेकेदाराच्या मुसक्या आज जंबो कारवाई करीत आवळल्या.

पैठण : नगर जिल्ह्याची हद्द सोडून पैठण तालुक्याच्या हद्दीत येणाऱ्या गोदावरीच्या पात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या नगरच्या ठेकेदाराच्या मुसक्या आय.पी.एस. दीक्षित गेडाम यांनी आज जंबो कारवाई करीत आवळल्या. पोलीस पथकाने केलेल्या कारवाईत मुंगी, ता. शेवगाव येथील वाळूपट्ट्यातून अंदाजे तीन कोटी रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.अहमदनगर जिल्ह्यात येणाऱ्या शेवगाव तालुक्यातील मुंगीचा वाळूपट्टा अहमदनगर जिल्हा प्रशासनाने लिलाव करून राजेंद्र दौड यांना दिला होता. मुंगी व पैठण तालुक्यातील नायगाव ही दोन्ही गावे गोदावरीच्या दोन तीरावर आमनेसामने आहेत. अलीकडे नायगाव, तर पलीकडे मुंगी व या दरम्यान येणाऱ्या गोदावरी पात्रात अर्धी हद्द नगर जिल्ह्याची व अर्धी हद्द औरंगाबाद जिल्ह्याची येते. अहमदनगर जिल्हा प्रशासनाने त्यांच्या हद्दीतील वाळूपट्टा लिलाव केला होता; परंतु गेल्या काही महिन्यांपासून संबंधित वाळूपट्ट्याचा ठेकेदार हा औरंगाबाद जिल्ह्याच्या पैठण हद्दीत येणाऱ्या गोदावरीच्या वाळूपट्ट्यातून बोट, सक्शन पंप, पोकलँड, जेसीबीच्या साह्याने अवैधरीत्या वाळूचा उपसा करून लाखो रुपयांची वाळू नगर जिल्ह्यात पुरवठा करीत होता.याबाबतची खबर मिळताच आयपीएस अधिकारी दीक्षित गेडाम यांनी पोलीस कर्मचारी एस.बी. पवार, संतोष चव्हाण, सचिन भुमे, सिराज पठाण, किरण गोरे, साबळे रवी, राम आडे, सोपान झाल्टे यांनी आज दुपारनंतर विविध वाहनांनी गोरेंच्या पट्ट्यात जाऊन छापा मारला. यावेळी पैठण हद्दीतून उपसा करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या ४ बोटी, ८ ट्रक, ४ पोकलँड, तीन मॅजिक पेन रॉयल्टी बुक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.गेडाम येताच सर्व जण फरारदीक्षित गेडाम यांनी नायगाव हद्दीत सुरू असलेल्या वाळू उपशावर छापा मारताच वाळूपट्ट्यातील सर्व जण फरार झाले. ट्रकचे चालक ट्रक सोडून पळाले. बोटीवरील आॅपरेटर पाण्यात उड्या मारून पोहत पोहत निघून गेले, तर वाळूपट्टा कार्यालयातील व्यवस्थापकही सर्व कागदपत्रे सोडून पळाले. (वार्ताहर)पैठण तहसील कार्यालयाचे माफियांना अभयगेल्या काही महिन्यांपासून नगरचे वाळू तस्कर पैठण हद्दीतून राजरोसपणे वाळूचा उपसा करीत आहेत. याद्वारे दररोज लाखो रुपयांच्या वाळूच्या व्यवहाराची उलाढाल होते. दिवसाढवळ्या होत असलेल्या या वाळू तस्करीला पैठण तहसीलचे अभय होते, अशी चर्चा होत आहे. नायगावच्या तलाठ्याने याबाबत पैठण तहसीलदारांना अहवाल दिला होता, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. आजही आय.पी.एस. गेडाम यांनी भेट देऊन वाळूपट्ट्यातून तहसीलदारांना बोलावून घेतले. त्यानंतर तहसीलदार संजय पवार व दोन तलाठी वाळूपट्ट्यात अवतरले व पुढील कारवाई करण्यात आली. आजच्या कारवाईने वाळू तस्करांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या प्रकरणी तहसील प्रशासनाची फिर्याद देण्याचे काम सुरू होते. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल होईल, असे आय.पी.एस. दीक्षित गेडाम यांनी सांगितले.