शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

तीन बोगस दवाखाने बंद

By admin | Updated: April 16, 2017 23:44 IST

टेंभुर्णी : तीन बोगस दवाखाने कायमचे बंद करण्यात आले आहेत

टेंभुर्णी : तालुका वैद्यकीय अधिकारी पथकाकडून बोगस डॉक्टरांच्या विरोधात कडक मोहीम उघडण्यात आली आहे. शनिवारी १२ रुग्णालयांची अचानक झाडाझडती घेतल्याने एकच खळबळ उडाली असून, या कारवाईत १० रुग्णालयास कारवाईची नोटीस बजावण्यात आली आहे. तर तीन बोगस दवाखाने कायमचे बंद करण्यात आले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे बोगस वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. या कारवाई दरम्यान दोन बोगस डॉक्टरांनी धूम ठोकली.जाफराबाद तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक वर्षांपासून बोगस डॉक्टरांनी ठिक ठिकाणी वैद्यकिय व्यवसाय सुरू करण्यासाठी दुकाने थाटली आहेत. या बोगस डॉक्टरांकडे वैद्यकीय व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक असलेली वैद्यकीय क्षेत्रातील पदवी नसतानाही बिनबोभाट रुग्णांच्या जीवघेणा उपचार सुरूच असल्याच्या तक्रारी आरोग्य विभागाकडे करण्यात आल्या होत्या. याची दखल घेऊन अतिरिक्त आरोग्य संचालक यांनी तालुका आरोग्य विभागाला सक्त आदेश देऊन अशा बोगस रूगणालयांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामध्ये सदरील रुग्णालयाची तपासणी करून रुग्णालयाची नोंदणी बॉम्बे नर्सिंग होम कायद्यानुसार आहे किंवा नाही, गर्भपात सेवेसाठी गर्भपात प्रतिबंधक कायदा १९७१ नुसार नोंदणी आहे किंवा नाही, सोनोग्राफी केंद्राची नोंदणी प्रसुतीपूर्व गर्भ लिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार झाली किंवा नाही, रुग्णालयातील औषधी दुकानास अन्न व औषध प्रशासनाकडून मंजुरी आहे किंवा नाही, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण कायदा नुसार बायोमेडिकल वेस्ट डिस्पोजल आहे किंवा नाही,अग्निशमन यंत्रे बसविले आहे किंवा नाही, आपली शैक्षणिक पात्रता वैद्यकीय क्षेत्राची उपचाराची सराव करण्यासाठी योग्य आहे किंवा नाही अशा बोगस रुग्णालयांची तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले होते. या वरून तालुका वैद्यकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मोटे, डोणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश आव्हाड, वैद्य, विसपुते व कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. यामुळे बोगस डॉक्टरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकेश मोटे, डॉ. गणेश आव्हाड यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, ज्या ज्या रुग्णालयाची तपासणी करण्यात आली आहे अशा रुग्णालयात वैद्यकीय क्षेत्रातील कायद्याचा नियमावलीनुसार अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या कारवाई करण्यात आली आहे. जर हे बोगस रुग्णालय सुरू झाल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.