खंडू भागवत सुरडकर (१९) हे कुटुंबासह तीसगाव परिसरातील खवड्या डोंगराजवळ राहतात. मंगळवारी दुपारी त्यांची बहीण दीपालीसोबत काम करणारा रणजित राजपूत (रा.वडगाव) हा खंडूच्या घरी आला. रणजितने जुन्या भांडणावरून दीपाली हीस शिवीगाळ केली व सोबत चालण्याचा आग्रह धरला. मात्र, दीपालीने नकार दिल्यामुळे रणजितने तिला मारहाण केली. खंडूने पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली होती. विरोधात तक्रार दिल्याची माहिती मिळताच दुपारी ३ वाजेच्या सुमारास रणजित याने वडगावात गेलेल्या खंडू, दीपाली व तिची आई मालताबाई यांच्याशी वाद घालून तिघांना मारहाण केली. या मारहाणीत खंडूचे डोके फुटले असून दीपालीही जखमी झाली.
---------------------