शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

साडेतीन कोटींचा निधी मंजूर

By admin | Updated: July 3, 2014 00:22 IST

कंधार : तालुक्यातील गावाची निकडीची कामे करण्यासाठी सन २०१४-१५ साठी मागास क्षेत्र विकास निधी ३ कोटी ४७ लाख २४ हजारांचा निधी मंजूर झाला असल्याची बाब समोर आली आहे़

कंधार : तालुक्यातील गावाची निकडीची कामे करण्यासाठी सन २०१४-१५ साठी मागास क्षेत्र विकास निधी ३ कोटी ४७ लाख २४ हजारांचा निधी मंजूर झाला असल्याची बाब समोर आली आहे़ विकासकामांतून गावांचा कायापालट होणार असल्याने ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे़तालुक्यात ११६ ग्रामपंचायती असून १२६ महसूली गावांची संख्या आहे़ एकूण गावे, वाडी-तांड्याची संख्या १८७ आहे़ बालाघाटच्या डोंगरानी हा भाग व्यापला आहे़ नैसर्गिक स्थिती, निसर्ग पावसावरील शेती, मोठ्या उद्योगधंद्याचा अभाव आदीमुळे अपेक्षित विकासासाठी मोठा संघर्ष करावा लागतो़ प्रश्न, समस्या लहान असली तरी सोडविण्यासाठी कसरत करावी लागते़ शासनस्तरावरील विविध योजना गावात येण्यासाठी पुढाऱ्यासह अधिकारी यांना पाठपुरावा करावा लागतो़ कामासाठीचा निधी मंजूर झाला की, गावकऱ्यांत मोठा उत्साह संचारतो़ यापूर्वी मंजूर झालेल्या निधीतून १ कोटी ६ लाख ६५ हजारांची कामे प्रगतीपथावर आहेत़ ग्रा़पं़च्या स्वत:च्या काही निधी ४२ लाख ४८ हजारांचा आहे़ यावर्षी बीआरजीएफपीमधून ३ कोटी ४७ लाख २४ हजार निधी मंजूर झाला आहे़ एकूण ४ कोटी ९६ लाख ३७ हजार किंमतीची १७७ कामांतून गावच्या समस्या दूर होण्यास हातभार लागणार आहे़ त्यामुळे गावाला नवे रूप प्राप्त होणार आहे़गावातील स्मशानभूमीला संरक्षक भिंत, स्मशानभूमी शेड, पाणीपुरवठा, जलकुंभ, वर्गखोली, शाळा संरक्षक भिंत, सौरउर्जा, पथदिवे, संगणककक्ष, ग्रामपंचायत कार्यालय संरक्षक भिंत, पूल, अंगणवाडी संरक्षक भिंत, अंगणवाडी इमारत, ग्रामपंचायत कार्यालय इमारत, समाजमंदिर, कम्युनिटी हॉल जलशुद्धीकरण यंत्र आदी कामे मार्गी लागणार आहेत़ शिक्षण, आरोग्य, महिला व बालकल्याण दळणवळण पाणी, समाजकल्याण आदी क्षेत्रातील विकासामुळे गावांचा कायापालट होणार आहे़ यापूर्वीची कामे तत्काळ पूर्ण करून नवीन कामे वेळेत पूर्ण केल्यास विकासाला मोठी चालना मिळणार आहे़(वार्ताहर)विविध विकासकामांचा आराखडा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता़ नियोजन समितीतील पालकमंत्री, आमदार, सर्व वरिष्ठ अधिकारी यांनी त्यास मंजुरी दिली़ प्रस्ताव मंजूर झाला असून येत्या काही दिवसांत निधी उपलब्ध होणार आहे़ निधी उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल़ त्यातून विकासास मोठी चालना मिळेल - ए़एस़ कदम (बीडीओ, कंधार)