शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात तीन अपघात; चार ठार

By admin | Updated: January 28, 2015 00:57 IST

बीड : जिल्ह्यातील वडवणी, परळी व शिरूर तालुक्यात प्रजासत्ताकदिनी व मंगळवारी तीन अपघात झाले. या अपघातात चौघे ठार झाले आहेत.

बीड : जिल्ह्यातील वडवणी, परळी व शिरूर तालुक्यात प्रजासत्ताकदिनी व मंगळवारी तीन अपघात झाले. या अपघातात चौघे ठार झाले आहेत. परळी येथे झालेल्या अपघाताचे रहस्य पोलिसांनाही उलगडलेले नाही. गेल्या दोन दिवसांत घडलेल्या घटनांमुळे हे वार अपघातवार ठरले आहेत. तिन्हीही अपघातामध्ये ठार झालेल्या व्यक्ती तरूण असल्याचे समोर आले आहे. मोटार सायकल अपघातशिरुर तालुक्यातील पौडुळ जवळ मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास दोन मोटार सायकलची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार तर दुसरा जखमी झाला. रामचंद पांडुरंग ढगे ( रा. टाकळ गव्हाण, गेवराई) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. रामनाथ शेवराव गात (रा.शिरापूर गात शिरुर) असे जखमीचे नाव आहे. ढगे हे विमा एजंट असल्याचे समजते. ते शिरुर तालुक्यातील पौडुळकडूून शिरापुरकडे दुचाकीवरुन जात होते तर रामनाथ गात हे शिरापुरकडून पौडुळकडे जात होते. दरम्यान, पौडुळजवळ दोघांच्या दुचाकींची धडक झाली. त्यात ढगे हे जागीच ठार झाले तर गात जखमी झाले. ही माहिती शिरुर पोलिसांना मिळताच ते दाखल झाले. अपघातातील दोन्ही दुचाकी क्र. एमएच-२३ एएच-११२५ व एमएच-२३ एआर- ५०२९ ताब्यात घेतल्या आहेत. गात यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. (प्रतिनिधी)४परळी : तालुक्यातील धर्मापुरी-घाटनांदुर रस्त्यावर सोमवारी दुपारी झालेल्या टिप्पर व दुचाकीच्या अपघातात एक जण जागीच ठार तर एक जखमी झाल्याची घटना घडली. टिप्परच्या मागच्या दोन चाकांमध्ये दुचाकी अडकली होती. या अपघातात चुक कोणाची हे अद्याप पोलिसांनाही समजू शकले नाही.दीपक गायकवाड (रा. मिलिंदनगर, परळी) असे त्या मयताचे नाव असून तो एका खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत होता.दीपक व त्याचा एक मित्र दुचाकीवरुन सोमवारी दुपारी अहमदपुरहून परळीकडे जात होते. धर्मापुरी जवळ टिप्पर व त्यांच्या दुचाकीची धडक झाली. त्यात दीपक हा जागीच ठार झाला तर त्याचा मित्र जखमी झाला. त्याच्यावर अंबाजोगाईच्या एसआरटी दवाखान्यात उपचार सुरु आहेत. अपघात झाल्यानंतर लोकांना मागच्या चाकामध्ये उलटी दुचाकी आढळुन आली. गायकवाड यांचे वाहन चाकामध्ये कसेकाय अडकले हे कोडे पोलिसांनाही उमगले नाही. या अपघाताची चौकशी सुरु असून सदरील टिप्पर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. \वडवणी: पुण्याहून नांदेडकडे जाणाऱ्या दुचाकीला मागून येणाऱ्या एका कारने जोराची धडक दिल्याने मोटार सायकलवरील दोनजण ठार तर एकजण गंभीर जखमी झाला. ही घटना शहरापासून जवळ असलेल्या सिद्धी विनायक कॉटन जिनिंग समोर सोमवारी सकाळी सातच्या सुमारास घडली. चांदू नारायण देशमुख व इंद्रराज रामराव काळे ( रा. वडगाव, ता. लोहा. जि. नांदेड) अशी अपघातात मयत झालेल्यांची नावे आहेत तर श्रीधर रामचंद्र काळे याचा कंबरेपासून एक पाय पूर्णत: तुटला आहे. त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, पुण्याहून नांदेडकडे दुचाकी (क्र. एमएच-२६ एएन-८२१७) वरुन चांदु देशमुख (वय २२ ), इंद्रराज काळे (वय २१ ) व श्रीधर काळे (वय २०) हे तिघे सोमवारी जात होते. बीड-परळी हायवेवरुन वडवणी शहरापासून जात असताना पाठीमागुन भरधाव वेगात येणारी कार (क्र. एमएच-४४ बी-७४४४) ने मोटार सायकलला जोराची धडक दिली. यामुळे मोटार सायकलवरील तीघे रस्त्याच्या बाजुला फेकले गेले. चांदु व इंद्रराजच्या डोक्याला, छातीला व पायाला गंभीर मार लागला तर श्रीधर काळे याचा एक पाय कंबरेपासून तुटून पडला. धडक देणारा कार चालक कार सोडून पळून गेला. ही माहिती आपत्त कालीने सेवेवर असणाऱ्या अ‍ॅम्ब्युलन्सला मिळाली. त्यांनी घटनास्थळी दाखल होत त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान चांदु देशमुख व इंद्रराज काळे यांचा मृत्यू झाला. पोलिसांनी घटनास्थळावरुन दोन्ही गाड्या ताब्यात घेतल्या असून कार चालकाचा तपास सुरु केला आहे.