शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

खरीप पेरणी वाया जाण्याची भीती!

By admin | Updated: July 2, 2017 00:38 IST

जाफराबाद : गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात पडलेल्या समाधानकारक पावसामुळे तालुक्यातील ६० हजार हेक्टरवर खरीपाची पेरणी पूर्ण करण्यात आली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने दडी दिल्याने खरिपाची पेरणी वाया जाण्याच्या चिंतेने शेतकरी हैराण आहे.तालुक्याचे जीवनमान शेती व्यवसायावर अवलंबून आहे. मागील वर्षात खरीप व रब्बी हंगामात शेतकऱ्यांच्या कोणत्याच शेतमालाला योग्य भाव न मिळाल्याने पेरण्या तोंडावर आल्या असताना जवळ आहे त्या पैशांत बी-बियाणांवर खर्च करण्यात आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी तालुक्यात पावसाने दमदार हजेरी लावली होती. आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी पडून जमिनीतून वाहून गेले आहे. यामुळे शेतकऱ्यांनी काही भागात दुबार पेरणी करून यावर पाणीच पडला नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पावसाळ्या पूर्वी भाव न मिळाल्याने कोणती पिक घ्यावयाचे या विषयी शेतकरी संभ्रमावस्थेत होता. त्यातून सावरत लागवड केली आहे. आता फक्त निळ्या आभाळाकडे नजर लागून आहे.मागील वर्षी तालुक्यातील ६१ हजार ९७६ हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या करण्यात आल्या होत्या. या वर्षात पावसाळा समाधानकारक राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला असल्याने जवळपास ६० हजार हेक्टरपेक्षा अधिक प्रमाणात पेरण्या झाल्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या दोन-तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण तयार होऊन तालुक्याच्या बोरगाव बु., हिवराबळी या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. शेतकऱ्यांनी शेतीवर मोठा खर्च केला आहे. तरी देखील पिके येण्याची हमी नाही. तालुक्यात शेती व्यवसायाला पूरक उद्योगधंदे नाहीत. त्यामुळे तालुक्याचे जीवनमान शेतीवर अवलंबून आहे. मागील दोन वर्षांची दुष्काळी परिस्थिती ओढवल्याने शेतकरी अडचणीत आहे. कृृषी विभागाने मार्गदर्शन करण्याची गरज निर्माण झाली आहे.