शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
3
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
4
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
5
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
6
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
7
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
8
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
9
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
10
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
11
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
12
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
13
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
14
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
15
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
16
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
17
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
18
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
19
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
20
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...

हजारो हेक्टरवरील द्राक्ष बागा धोक्यात !

By admin | Updated: November 16, 2014 00:36 IST

भूम : अल्प पाऊस व मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने असणाऱ्या ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्हाभरातील हजारो

भूम : अल्प पाऊस व मागील पंधरा दिवसांपासून सातत्याने असणाऱ्या ढगाळ वातावरण आणि अधूनमधून पडणाऱ्या पावसामुळे जिल्हाभरातील हजारो हेक्टरवरील द्राक्षबागा धोक्यात आल्या आहेत. एकट्या भूम तालुक्यात ९०४ हेक्टरवर द्राक्षबागा आहेत.तालुक्यात अलीकडच्या काळात मोसमी शेतीसोबत शेतकरी द्राक्ष बागेकडे वळला आहे. तालुक्यात जवळपास ९०४ हेक्टर द्राक्षबागेचे क्षेत्र असून, खास भूम मंडळास क्षेत्र अधिक आहे. परंतु मागील पाच-सहा वर्षात क्षेत्र जरी वाढले असले तरी अत्यल्प पाऊस व ढगाळ हवामान सातत्याने पडत असून, तर गतवर्षी अवकाळीचा फटका तर यंदा सध्या गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ हवामानामुळे द्राक्ष बागेस ढावणी, बुरी, करपा या रोगाने परेशान केले असल्याने दर महिन्याला २० हजार अतिरिक्त खर्च फवारणीसाठी करावा लागत असल्याचे चित्र आहे. सध्या द्राक्ष बागेची आॅक्टोबर महिन्यात छाटणी झाली. यासाठी एकरी १० हजार रुपये खर्च झाला आहे. सध्या बागा फुलोऱ्यात असताना अधून-मधून पडणारा पाऊस व ढगाळ हवामान, सुटणारे वारे यामुळे घडाचे मनी गळत आहेत. दरम्यान, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या छाटणीनंतर पाऊस झाल्यास बागास धोका होवू शकतो. त्यानुसार १३ नोव्हेंबर रोजी चिंचपूर परिसरात चांगला पाऊस झाल्याने द्राक्ष बागांच्या घडाचे मनी गळत असल्याने नुकसान होत असल्याचे चित्र आहे. हिच परिस्थिती कायम राहिल्यास द्राक्षबागा जगविणे अवघड असल्याचे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांतून बोलले जात आहे.दरम्यान, हवामान खराब झाल्यावर दरवर्षी थोड्याफार प्रमाणात फटका बसतो. परंतु यंदा मागील तीन-चार दिवसांपासून ढगाळ हवामान व झालेला पाऊस यामुळे फवारणी खर्च वाढला आहे. साधारण एक एकर द्राक्ष बागेसाठी दीड लाख रुपये खर्च माल तयार होईपर्यंत लागतो. परंतु यंदा अत्यल्प पाऊस, त्यानंतर मशागत खर्च, छाटणी खर्च तर आता ढगाळ हवामान व पाऊस यामुळे गतवर्षीच्या तुलनेत खर्च अधिक वाढला आहे. यावर्षी अधिक भाव मिळाला तरच हाती काहीतरी येईल, अन्यथा शेतकरी आर्थिक संकटात सापडेल, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गतवर्षी २० ते ४० रुपयापर्यंत भाव होता. त्या तुलनेत यावर्षी ५० रुपये असल्याचेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले. तालुक्यात चिंचपूर ढगे, वालवड, सामनगाव, चिंचोली, भूम परिसर, हिवरा, हाडोंग्री, दिंडोरी, उळूप, पाठसांगवी, राळेसांगवी या भागात द्राक्षबागा अधिक आहेत.मागील आठवडाभरापासून सातत्याने ढगाळ हवामान व चिंचपूर परिसरात पाऊस झाल्याने द्राक्ष बागेच्या घडाचे मनी गळत आहेत. तर खराब हवामानाचा फटका बसत असल्याने फवारणीसाठी महिन्याला २० हजार अतिरिक्त खर्च वाढत आहे. तर दिवसातून दोन वेळेस फवारणी करण्याची वेळ आली असल्याचे चिंचपूर येथील द्राक्ष बागायतदार अजित रामदास ढगे यांनी सांगितले.यावर्षी अत्यल्प पाऊस, त्यात कशीबशी बाग जोपासली. परंतु मागील चार-पाच दिवसांपासून बाग फुलोऱ्यात असताना पडणारा पाऊस व खराब हवामानाचा फटका गतवर्षीच्या तुलनेत औषध फवारणीचे भाव दुपटीने वाढल्याने बागेचे संगोपन करता करता आर्थिक तोटा होत असल्याचे धनंजय मस्कर यांनी सांगितले. (वार्ताहर)