१७ मेरोजीपर्यंत १००३ कोरोनाबाधितांची नोंद भेंडाळा आरोग्य केंद्रात झाली. त्यातील ७७६ रुग्ण उपचार घेऊन बरे झाले असून, सध्या २१६ रुग्ण उपचार घेत आहेत. या काळात उपचारादरम्यान ११ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. केंद्रातील भेंडाळा आणि कायगाव कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले होते. मात्र त्यानंतर प्रशासनाने काटेकोर नियोजन करून कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणला.
आरोग्य केंद्रांतर्गत येणारी गावे व रुग्णसंख्या :
कायगाव : ८७, वाहेगाव : १३४, भेंडाळा : १०७, गणेशवाडी : २३, पखोरा : १३, लखमापूर : ३७, नेवरगाव : ९०, भिवधानोरा : ३३, मांजरी : ७०, जामगाव : ७९, कानडगाव : ८, अंमळनेर : ३२, वरखेड : १०६, अगरवाडगाव : १०, पिंपळवाडी : ४, बगडी : २७, बाबरगाव : २२, नवाबपूरवाडी : २६, ममदापूर : १२, बोलेगाव : १८, हनुमंतगाव : ७, सोलेगाव : १२, माहुली : २, ढोरेगाव : १०, मुद्देश वाडगाव : १२, बोरजाई : ३, रघुनाथनगर : १