शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
4
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
5
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
6
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
7
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
8
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
9
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
10
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
11
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
12
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
13
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
14
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
15
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
16
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
17
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
18
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
19
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
20
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?

जात पंचायतीने कुटुंबाला टाकले वाळीत

By admin | Updated: October 7, 2016 01:31 IST

औरंगाबाद : जातीपातीच्या बेड्या आजही प्रचंड मजबूत आहेत. मागास आणि आदिवासी समाजातील कौटुंबिक वादावरही जात पंचायतीकडूनच निर्णय केला जातो

औरंगाबाद : जातीपातीच्या बेड्या आजही प्रचंड मजबूत आहेत. मागास आणि आदिवासी समाजातील कौटुंबिक वादावरही जात पंचायतीकडूनच निर्णय केला जातो. अशाच एका घटनेत जडीबुटी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या चित्तोडिया लोहार समाजातील एका कुटुंबाला तब्बल तीन वर्षांपासून जातीबाहेर टाकण्यात आले आहे. कुटुंबातील एका सदस्यावर त्याच्याच सासऱ्याने परस्त्रीसोबत संबंध असल्याचा आरोप ठेवल्याने या कुटुंबाला तीन वर्षांपासून त्यांच्याच समाजात स्थान नाही. परिणामी या कुटुंबात कोणीही मुलगी देण्यास तयार नसल्याने दोन तरुणांचे विवाह होऊ शकले नाही.याविषयी अधिक माहिती अशी की, देवळाई परिसरातील विनायक पार्कजवळ राणसिंग तेजसिंग चित्तोडिया (३५) हे पत्नी ताराबाई, भाऊ तारासिंग, रामसिंग आणि आई-वडील यांच्यासह राहतात. हे कुटुंब जडीबुडी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. आॅगस्ट-२०१३ मध्ये राणासिंग यांना त्यांचे सासरे रतनसिंग ठाकूर (रा. हिंजेवाडी, दत्तवाडी, पुणे) यांनी फोन करून तू एका महिलेसोबत अनैतिक संबंध ठेवले आहे. त्यामुळे तुम्हा सर्व कुटुंबांना जातीबाहेर काढून टाकले असल्याचे सांगितले. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकीही दिली. राणासिंग यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळत ‘त्या महिलेचे नाव सांगा’ असे आव्हान देऊन ते खरे निघाल्यास कोणतीही शिक्षा भोगायला तयार असल्याचे सांगितले. काही दिवसांनंतर रतनसिंग ठाकूर हे रवींद्रसिंग ठाकूर, देवीसिंग चित्तोडिया, कृष्णासिंग चित्तोडिया आणि नवलसिंग चित्तोडिया हे औरंगाबादेत आले. यावेळी त्यांनी पुन्हा राणासिंग यांच्यावर परस्त्रीसोबत अनैतिक संबंध ठेवल्याचा आरोप केला. त्यांनी तुमच्या कुटुंबाला जातीबाहेर काढण्यात आल्याचे पुन्हा सांगितले. पुन्हा जातीत यायचे असेल तर गंगापरीक्षा (शुद्धीकरण) द्यावी लागेल, असे सांगितले.पाच जणांविरोधात गुन्हाराणासिंग यांनी २९ सप्टेंबर रोजी चिकलठाणा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी आरोपी रतनसिंग ठाकूर, रवींद्रसिंग ठाकूर, देवीसिंग चित्तोडिया, कृष्णासिंग चित्तोडिया व नवलसिंग चित्तोडिया यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.