शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’१६ अल्पवयीन मुली मुंबईच्या संस्थेकडे सुपूर्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी (४ डिसेंबर) औरंगाबाद खंडपीठाच्या प्रबंधकांनी शहानिशा करून शहादा येथील अनैतिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी (४ डिसेंबर) औरंगाबाद खंडपीठाच्या प्रबंधकांनी शहानिशा करून शहादा येथील अनैतिक देहव्यापार प्रकरणातील सोळा अल्पवयीन मुलींचा तात्पुरता ताबा मुंबई येथील रेस्क्यू फाऊंडेशन या अशासकीय संस्थेला दिला. औरंगाबाद पोलीस पथकाच्या संरक्षणात वरील मुलींना मुंबईपर्यंत पोहोचविण्यासाठी रात्री उशिरा रवाना करण्यात आले.दरम्यान, वरील पीडित मुलींना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वरील संस्थेकडे सोपविण्यात येत असल्याचे प्रबंधकांनी संबंधितांना सांगताच ‘त्या’ मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी खंडपीठ परिसरातच रडारड करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शहादा येथून त्या मुलींना घेऊन आलेले पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत आणि त्यांच्या सहकारी कर्मचाºयांनी खंडपीठातील पोलिसांच्या मदतीने कौशल्याने परिस्थिती हाताळत त्यांना शांत करून सुरक्षितपणे वाहनात बसविले. त्या मुलींना सोपविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत चालू होती. ती पूर्ण झाल्यानंतरच पोलीस निरीक्षक बुधवंत आणि त्यांचे सहकारी शहाद्याकडे रवाना झाले.रेस्क्यू फाऊंडेशनची याचिकाया मुलींचा ताबा आपल्याला देण्यात यावा, अशी विनंती करणारी याचिका रेस्क्यू फाऊंडेशनने सर्वोच्च न्यायालयात केली होती. त्यावर झालेल्या सुनावणीअंती सर्वोच्च न्यायालयाने वरीलप्रमाणे निर्देश दिले.प्रकरणाची पार्श्वभूमीशहादा येथे २०१४ मध्ये पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात वेश्या व्यवसाय करणाºया ६८ महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यापैकी १८ मुली या अल्पवयीन असल्याचे आढळले. त्यांचा ताबा आपल्याला देण्यात यावा, अशी विनंती त्यांच्या पालकांच्या वतीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांच्या न्यायालयात करण्यात आली. सुनावणीअंती या मुलींचा ताबा त्यांच्या पालकांकडे देण्यात आला. या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रेस्क्यू फाऊंडेशन या अशा महिलांसाठी काम करणाºाा संस्थेने आव्हान दिले. सुनावणीत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाºयांचा आदेश रद्द करण्यात आला. हे प्रकरण अद्याप औरंगाबाद खंडपीठात प्रलंबित आहे.