शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तीसगाव-छावणी रस्ता बनला धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 21:21 IST

तीसगाव ते छावणी उड्डाणपूल रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे.

वाळूज महानगर : तीसगाव ते छावणी उड्डाणपूल रस्त्याची अंत्यत दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता उखडल्याने रस्त्यावर खडी पसरली असून, जागोजागी मोठ मोठे खड्डे पडले आहेत. खडी व खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटना घडत असल्याने हा रस्ता वाहनधारकांसाठी धोकादायक बनला आहे.

औरंगाबाद-नगर महामार्गावरील छावणी उड्डाण पूल ते तीसगाव जाणाऱ्या रस्त्याची अतिशय वाईट अवस्था झाली आहे. जवळपास दोन ते अडीच किलोमीटर असलेला हा रस्ता उखडला गेला असल्याने रस्त्यावर खडी पसरली असून, जागोजागी खड्डे पडले आहेत.

तीसगावसह परिसरातील सिडको, वडगाव कोल्हाटी, बजाजनगर, साजापूर, करोडी आदी भागातील नागरिक या रस्त्याने ये-जा करतात. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणारे शहरातील कामगारही या रस्त्याचा वापर करतात. मात्र रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरुन ये-जा करणाºया वाहनधारकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. जवळचा मार्ग असूनही रस्ता धोकादायक बनल्याने तीसगावसह परिसरातील नागरिकांना तीन ते चार किलोमीटरचा वळसा घालून एएस क्लब चौकातून औरंगाबाद-नगर महामार्गाने ये-जा करावी लागत आहे.

रस्ते विकासात अडथळास्थानिक ग्रामपंचायतीने दोन वेळा रस्ता दुरुस्तीचे काम हाती घेतले. कामासाठी खडीही टाकण्यात आली. मात्र, सदरील रस्ता छावणी हद्दीत येत असल्याने छावणी प्रशासनाने कामासाठी टाकलेली खडी उचलायला लावली.

तसेच आमदार निधीतूनही हा रस्ता मंजूर करण्यात आला. पण पुन्हा छावणी प्रशासनाचे रस्ता विकास कामाला विरोध केला. गेल्या काही वर्षापासून आजतागायत रस्याचे काम तसेच रखडले आहे.

ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा सुरुचगावातील नागरिक १९७२ पासून या रस्त्याने ये-जा करतात. परंतू छावणी प्रशासन हा रस्ता नसल्याचे सांगत आहे. रस्ता दुरुस्तीसाठी छावणी प्रशासनाची भेटही घेतली. सदरील रस्त्याचा प्रस्ताव पुणे येथील छावणीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवितो, असे छावणी प्रशासनाने सांगितले. या रस्त्याच्या विकासासाठी ग्रामपंचायतीकडून पाठपुरावा केला जात असल्याचे सरपंच कौशल्याबाई रामचंद्र कसुरे यांनी सांगितले.

टॅग्स :Walujवाळूजroad transportरस्ते वाहतूक