शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आंदोलकांकडून तेराव्याचा कार्यक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:49 IST

नारेगाव कचरा डेपोचा १६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. २५ रोजी दहाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी या भागातील आंदोलक शेतक-यांनी चक्क तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. गोड जेवणही यावेळी देण्यात आले.

ठळक मुद्देगोड जेवण : पंचक्रोशीतील नागरिकांची अलोट गर्दी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव कचरा डेपोचा १६ फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. २५ रोजी दहाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यानंतर बुधवारी या भागातील आंदोलक शेतक-यांनी चक्क तेराव्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमास पंचक्रोशीतील नागरिकांनी अलोट गर्दी केली होती. गोड जेवणही यावेळी देण्यात आले.एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर ज्या पद्धतीने दहावा, तेरावा असे विधी केले जातात त्याच पद्धतीने नारेगाव पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी बुधवारी कचरा डेपोचा तेरावा केला. कचरा डेपो हटविण्यात यावा, या मागणीसाठी परिसरातील पंधरा गावांतील नागरिकांनी १६ फेब्रुवारीपासून आंदोलन सुरू केले आहे. आंदोलन शंभर टक्के यशस्वी झाले आहे. १४ दिवसांमध्ये मनपाची एकही गाडी कचरा डेपोकडे फिरकली नाही. आंदोलक शेतकरी दररोज वेगवेगळे कार्यक्रम याठिकाणी घेत आहेत. २५ फेब्रुवारी रोजी कचरा डेपोच्या दहाव्याचा कार्यक्रम घेण्यात आला होता. त्यानंतर एक निमंत्रणपत्रिका छापून बुधवारी तेराव्याचा कार्यक्रम घेण्यात आला. कचरा डेपोजवळ सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली होती. सकाळी दहा वाजता हभप विनोदाचार्य साठे महाराज यांचे कीर्तन झाले. दुपारी एक वाचता कीर्तन संपल्यानंतर तेराव्याचा विधी करण्यात आला. गाईला घास दिल्यानंतर गोड जेवणाच्या पंक्ती बसल्या. यावेळी शालेय विद्यार्थ्यांनीही मोठ्या संख्येने गर्दी केली होती. गेल्या तेरा दिवसांपासून आंदोलनाचा किल्ला लढविणाºया परिसरातील ग्रामस्थांचा यावेळी सत्कार करण्यात आला. सर्वांच्या एकीमुळेच शासन हादरले, पालकमंत्री, विधानसभा अध्यक्षांना येथे यावे लागले. कचरा डेपोचा प्रश्न मार्गी लागत आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या. पुंडलिकअप्पा अंभोरे, डॉ. विजय डख, मनोज गायके, विष्णू भेसर, साईनाथ चोथे, नाना पळसकर, संजय हरणे, भाऊसाहेब गायके, विष्णू जाधव, डॉ. दिलावर बेग यांच्यासह नागरिकांची उपस्थिती होती.महिला, विद्यार्थी उपस्थितनारेगाव कचरा डेपोविरोधात पुरुषांप्रमाणेच पंचक्रोशीतील महिलांच्या भावनाही तीव्र आहेत. विद्यार्थ्यांचाही आंदोलनात सहभाग आहे. हे सर्वजण आजच्या तेराव्याच्या कार्यक्रमाला उपस्थित होते.