शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा विश्वासू मित्र देश रशिया करणार पाकिस्तानची मदत?; JF 17 लढाऊ विमानाला पुरवणार इंजिन
2
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
3
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
4
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
5
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा
6
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
7
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
8
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
9
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
10
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
11
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
12
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
13
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
14
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
15
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
16
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
17
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
18
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
19
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
20
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत

पतीचा खून करणाºया तिसºया पत्नीला जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 23:54 IST

दोन एकर शेती स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी मध्यरात्री लोखंडी गजाने मारहाण करून पतीचा खून करून विजेच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाल्याचे भासवणाºया मयताच्या तिसºया पत्नीला सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी बुधवारी (दि.१४ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.

ठळक मुद्देखून: विजेच्या धक्क्याने मृत्यू झाल्याचे भासविले

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : दोन एकर शेती स्वत:च्या नावावर करून घेण्यासाठी मध्यरात्री लोखंडी गजाने मारहाण करून पतीचा खून करून विजेच्या धक्क्याने पतीचा मृत्यू झाल्याचे भासवणाºया मयताच्या तिसºया पत्नीला सत्र न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी बुधवारी (दि.१४ फेब्रुवारी) जन्मठेपेची शिक्षा आणि पाच हजार रुपये दंड ठोठावला.यासंदर्भात मृत रामदास साळूबा लोखंडे (४८), रा. साखरवेल, ता. कन्नड यांची पहिली पत्नी लक्ष्मीबाई रामदास लोखंडे यांनी फिर्याद दिली होती. त्यानुसार, रामदास हे तिसरी पत्नी संगीताबाई (४०) हिच्यासोबत राहत होते. पतीच्या नावावर असलेली दोन एकर वडिलोपार्जित शेती स्वत:च्या नावावर करून द्यावी, असा तगादा संगीताबाई रामदासच्या मागे लावत होती. त्यावरून दोघांमध्ये भांडणे होत होती. त्यातूनच २१ आॅगस्ट २०१२ रोजी मध्यरात्री दोनच्या सुमारास आरोपीने रामदास यांच्या डोक्यावर, तसेच हात-पाय, ओठ, डोळे, पाठ आदी अनेक ठिकाणी लोखंडी गजाने मारहाण करून त्यांचा खून केला.रामदासला विजेचा धक्का लागून त्यांचा मृत्यू झाल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला होता. या गुन्ह्यात आरोपीविरुद्ध भा.दं.वि.कलम ३०२ अन्वये पिशोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. पोलीस उपनिरीक्षक एस. एस. खांडेकर यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. खटल्याच्या सुनावणी वेळी, सहायक सरकारी वकील अनिल हिवराळे यांनी ९ साक्षीदारांचे जबाब नोंदविले. रामदास यांना मारहाणीमध्ये झालेल्या जखमा या विजेच्या धक्क्याने होऊ शकत नाहीत, असे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद व साक्ष-पुराव्यांवरून न्यायालयाने आरोपी संगीताबाईला भा.दं.वि.कलम ३०२ अन्वये वरीलप्रमाणे शिक्षा व दंड ठोठावला. या प्रकरणामध्ये परिस्थितीजन्य पुरावा, तसेच मृताच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची झालेली इजा व त्यामुळे झालेल्या मोठ्या प्रमाणावरील रक्तस्रावातून रामदास यांचा मृत्यू झाल्याचा वैद्यकीय अहवाल, या बाबींची न्यायालयाने दखल घेऊन वरीलप्रमाणे निकाल दिला.