व्यंकटेश वैष्णव , बीडपिण्याच्या पाण्यासाठी मैलोन्मैलची पायपीट करावी लागत आहे. सद्यस्थितीत निम्म्या जिल्ह्याची तहान ८०० टँकरद्वारे होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून आहे. टँकरचा हा आकडा मागील तीन वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक आहे. जिल्ह्याची लोकसंख्या २५ लाखाच्या जवळपास आहे. यापैकी ११ लाख ७० हजार ५६१ नागरिकांना दररोज टँकरनेच पाणीपुरवठा केला जात आहे. पाण्याच्या टँकरने ८०० चा आकडा गाठला आहे. प्रशासनाने जे उद्भव अधिग्रहीत केले आहेत ते हळूहळू आटत आहेत. सद्यस्थितीत एकूण ८७० पाण्याचे उद्भव जिल्हा प्रशासनाने अधिग्रहीत केलेले आहेत. यापैकी आष्टी, बीड, शिरूर कासार व पाटोदा तालुक्यातील उद्भव अटण्याच्या मार्गावर आहेत.सद्यस्थितीस ५० ते ६० किलोमीटरवरून पिण्याचे पाणी टँकरने आणावे लागत आहे. मात्र, दुष्काळाची दाहकता पाहून ७० किलोमीटर वरून पाणी आणण्याची वेळ जिल्हा प्रशासनावर येण्याची चिन्हे आहेत.बीड तालुक्यात सर्वाधिक टँकरबीड तालुक्यात एकूण १६४ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये १७१ गावे तर ८२ वाड्यांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यात बीड, आष्टी, शिरूर कासार, गेवराई, केज या तालुक्यांमध्ये ७५ ते १५० च्या घरात टँकर सुरू आहेत.
निम्म्या जिल्ह्याची तहान टँकरवर
By admin | Updated: April 14, 2016 01:16 IST