शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जबरी चोरीचे तेरा गुन्हे उघडकीस

By admin | Updated: May 17, 2017 00:43 IST

जालना : घरफोडीसह जबरी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : घरफोडीसह जबरी चोरीचे १३ गुन्हे उघडकीस आणण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी सोलापूर येथून ताब्यात घेतलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयितांकडून रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने, असा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. विविध गुन्ह्यांमध्ये हव्या असलेल्या संशयितांची शोधमोहीम स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतली आहे.गोंदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील शहागड येथील घरफोडी व जबरी चोरीतील संशयित पुणे व सोलापूर जिल्ह्यात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. प्राप्त माहिती आधारे गुन्हे शाखेचे एक पथक सोलापूरला पाठविण्यात आले. पथकाने अकलूज (जि. सोलापूर) येथील वडार वस्तीवरून संशयित विजय सर्जेराव जाधव (वय २३) व रमेश अण्णा शिंदे (वय २४, दोघे, रा. मंगरूळ) यांना ताब्यात घेतले.जालना येथे आणल्यानंतर चौकशीत त्यांनी जालना व पुणे जिल्ह्यासह तेलंगना, कर्नाटक राज्यात घरफोडीचे विविध गुन्हे केल्याची कबुली दिली. जालना जिल्ह्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यातील एक, कदीम जालना ठाण्यातील चार, तालुका ठाण्यातील दोन चंदनझिरा ठाण्यातील एक, अंबड ठाण्यातील एक, घनसावंगी ठाण्यातील एक आणि गोंदी ठाण्यातील तीन, अशा तेरा ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. पोलिस अधीक्षक रामनाथ पोकळे व अप्पर पोलिस अधीक्षक लता फड यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोळुंके, कर्मचारी सुरेश गिते, सॅम्युअल कांबळे, संजय मगरे, भालचंद्र गिरी, सदाशिव राठोड, हिरामण फलटणकर, सचिन चौधरी, विलास चेके यांनी ही कारवाई केली.