शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी मंदिरातून पंचधातूच्या 3 मुर्त्यांची चोरी करून पुन्हा ३ दुकानेही लुटली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 17:29 IST

गंगापूर येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यानी जवळपास ३ लाख ५० हजाराच्या ३ मुर्त्यांची चोरी केली. तिन्ही मुर्त्या भगवान महावीर यांच्या असून पंचधातुंच्या होत्या. यासोबतच इतर ३ दुकानेही फोडत त्यांनी हजारो रुपयाचा गल्ला चोरट्यानी लुटला.

औरंगाबाद, दि. २८ : गंगापूर येथील जैन मंदिराचे प्रवेशद्वार तोडून चोरट्यानी जवळपास ३ लाख ५० हजाराच्या ३ मुर्त्यांची चोरी केली. तिन्ही मुर्त्या भगवान महावीर यांच्या असून पंचधातुंच्या होत्या. यासोबतच इतर ३ दुकानेही फोडत त्यांनी हजारो रुपयाचा गल्ला चोरट्यानी लुटला. हि घटना रविवारी मध्यरात्री २ च्या सुमारास घडली असून गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.   

या बाबत अधिक माहिती अशी कि, मुनीसुव्रतनाथ दिगंबर जैन मंदिरास रात्री कुलूप असते. हीच संधी साधून चोरांनी रविवारी रात्री २ च्या सुमारास मुख्य प्रवेशद्वार तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, ते कुलूप अत्याधुनिक तंत्राचे असल्याने तुटले नाही. यानंतर चोरट्यांनी मंदिराच्या डाव्या बाजूस असलेला दरवाजा तोडला व आता प्रवेश केला. प्रवेश करताच समोरच दानपेटी ठेवण्यात आलेली आहे. ती तोडून त्यातील जवळपास 70 हजार रुपये त्यांनी ताब्यात घेतले. यानंतर आत मोठ्या मूर्ती समोरील भगवान महाविराच्या ३ पंचधातूच्या मुर्त्यांची त्यांनी चोरी केली. यातील एक मूर्ती 9 किलो 800 ग्राम तर एक मूर्ती 6 किलो ग्राम वजनाची आहे. या तिन्ही मुर्त्यांची बाजार भावाप्रमाणे किंमत जवळपास ३ लाख ५० हजार रुपये आहे.

आणखी ३ दुकाने फोडली तेथून बाहेर निघून चोरट्यांनी जवळपास 2.32 मिनिटांनी रस्त्यातील ३ दुकानाचे शटर तोडले. यातूनही गल्ल्यातील हजारो रुपये त्यांनी लुटले. यावेळी हा सारा प्रकार रस्त्यावरील एका दुकानच्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे.  

सीसीटीव्हीची दिशा होती वळवलेली रस्त्यामधील दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये रात्री २ वाजता एका बाईकवर ३ जण मंदिराच्या दिशेन जात असलेले दिसते. विशेष् म्हणजे चोरी झालेले मंदिर व दुकाने या ठिकाणची सीसीटीव्ही कालपासूनच बंद होती. तसेच मंदिर व चोरी झालेली तिन्ही दुकानाच्या जवळील सीसीटीव्हीची दिशा आदल्या दिवशीच वळवून ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. चोरीची माहिती मिळताच गंगापूर पोलिस ठसेतज्ञ व श्वान पथकाच्या सह्हायाने पुढील तपास करत आहेत.