शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

खामगा, सुरतगाव, कुंभेफळ येथे चोऱ्या

By admin | Updated: February 21, 2017 22:59 IST

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७४ हजाराचा ऐवज लंपास केला़

उस्मानाबाद : तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथे चोरट्यांनी घरफोडी करून ७४ हजाराचा ऐवज लंपास केला़ तर परंडा तालुक्यातील साकत (बु़) शिवारात घरफोडी करून चोरट्यांनी एक लाख ४० हजाराचा ऐवज लंपास केला़ तर उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव शिवारातील मोबाईल शॉपी फोडून ४२ हजाराचा मुद्देमाल लंपास केला़ या घटना १८ ते २० फेब्रुवारी दरम्यान घडल्या असून, संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर तालुक्यातील सुरतगाव येथील ज्योतीराम भागवत गुंड हे सोमवारी सकाळी घराला कुलूप लावून शेतात कामाला गेले होते़ घरी कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी त्यांच्या घराच्या खिडकीचे गज तोडून आतमध्ये प्रवेश केला़ घरातील लोखंडी पेटी व सुटकेस मध्ये ठेवलेले रोख रक्कम, सोन्याचे दागिने असा ७४ हजार ५०० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ सायंकाळच्या सुमारास ही घटना समोर आली़ या प्रकरणी भागवत गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द तामलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोउपनि एम़टीक़ांबळे करीत आहेत़परंडा तालुक्यातील तालुक्यातील साकत (बु़) शिवारातील शेतवस्तीवर बळीराम धर्मा आवाळे यांचे घर आहे़ सोमवारी सकाळी शेतातील काम करण्यासाठी बळीराम आवाळे व त्यांच्याव घरातील सदस्य गेले होते़ दुपारच्या सुमारास चोरट्यांनी फोडले़ त्यांच्या घरातील कपाटात ठेवलेले रोख २५ हजार रूपये व सोन्याचे दागिने असा तब्बल एक लाख ४० हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला़ याबाबत बळीराम आवाळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़ या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि वाघमोडे हे करीत आहेत़ उस्मानाबाद तालुक्यातील खामगाव येथील रत्नदीप नागनाथ शिनगारे यांचे उस्मानाबाद- तडवळा मार्गावर मोबाईल शॉप आहे़ १८ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास मोबाईल शॉपीचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश केला़ दुकानातील तीन मोबाईल, एक युपीएस, दोन लहान साऊंड, ३० मोबाईल चार्जर, २५ बॅटऱ्या, मोबाईल रिंगर यासह रोख १२ हजार रूपये असा जवळपास ४२ हजार ४० रूपयांचा मुद्देमाल लंपास केला़ याबाबत रत्नदीप नागनाथ शिनगारे यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अधिक तपास पोहेकॉ कदम हे करीत आहेत़ (प्रतिनिधी)