शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गंगापूरमध्ये चोरट्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:50 IST

शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शुक्रवारी एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या

लोकमत न्यूज नेटवर्कगंगापूर : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, शुक्रवारी एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या, तर शनिवारी (दि.२८) भरदिवसा बसस्थानकात महिलेचे गंठन लांबविल्याची घटना घडली. चोरट्यांनी एकूण साडेतीन लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. शहरात एकापाठोपाठ एक चो-यांचे सत्र सुरूच असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. चोरट्यांनी गंगापूर पोलिसांना एकप्रकारे आव्हान दिले आहे. पोलीस शहरातील चोरीचे सत्र थांबविण्यात अशस्वी ठरल्याने नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल रोष व्यक्त केला आहे.विशेष म्हणजे महिनाभरात गंगापूर पोलीस ठाणे हद्दीत १५ ठिकाणी चोरीच्या घटना घडल्या आहेत. या चोरीच्या घटनांतील आरोपींचा अद्यापही थांगपत्ता नाही. आता शनिवारी पुन्हा चोरट्यांनी शहरात धुमाकूळ घाल्याने नागरिक दहशतीखाली आहेत. दरम्यान, शनिवारी चोरांचा शोध घेण्यासाठी गुन्हे अन्वेषणची दोन पथके गंगापूरमध्ये दाखल झाली होती.पहिल्या घटनेत शनिवारी पहाटे ४ वाजेदरम्यान गंगापूर शहरातील जयसिंगनगरमध्ये मंगलबाई विलास निरफळ आपल्या कुटुंबातील सदस्यांसह झोपले असताना अज्ञात तीन जणांनी तोंडाला रुमाल बांधून घरात प्रवेश केला व निरफळ यांच्या गळ्याला धारदार शस्त्र लावून घरात जे काही असेल ते तात्काळ काढून देण्याची मागणी केली. यानंतर चोरट्यांनी घरातील ५८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने घेऊन पोबारा केला.दुस-या घटनेत वैैजापूर मार्गावरील रमेश तापडिया यांचे हार्डवेअर असलेल्या दुकानाच्या बेसमेंटसमोर त्यांनी ९० हजार रुपये किमतीची दुचाकी उभी केली होती. पहाटे ४ वाजेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकाकडून दुचाकीवर आलेल्या दोन आरोपींनी लॉक तोडून तापडिया यांची दुचाकी लंपास केली. सदर आरोपींनी वैजापूरच्या दिशेने पलायन केल्याचे सीसीटीव्हीत दिसले. मात्र, आरोपींचे चेहरे स्पष्ट दिसत नसल्याने त्यांची ओळख पडली नाही.तिसºया घटनेत जयसिंगनगरमधील पप्पू राजपूत यांच्या घरासमोरील ७५ हजार रुपये किमतीची स्पोर्टस् बाईक चोरट्यांनी बनावट चावीच्या मदतीने लंपास केली. एकाच रात्री चोरट्यांनी चार ठिकाणी केलेल्या चो-यांची शहरात वार्ता पसरताच नागरिकांनी पोलिसांच्या कामगिरीबद्दल रोष व्यक्त करून गस्त वाढविण्याची मागणी केली आहे. दरम्यान या तिन्ही घटनांची गंगापूर पोलीस ठाण्यात नोंद घेण्यात आली.