शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

चोरट्यांनी सीसीटीव्ही फुटेजबॉक्सच लांबविला

By admin | Updated: January 9, 2015 00:49 IST

जालना : शहरातील एक इलेक्ट्रीकल दुकान चोरट्यांनी आठ महिन्यात दुसऱ्यांदा फोडले.

जालना : शहरातील एक इलेक्ट्रीकल दुकान चोरट्यांनी आठ महिन्यात दुसऱ्यांदा फोडले. पहिल्या चोरीत पाच लाखाचा मुद्देमाल चोरणाऱ्या चोरट्यांनी यावेळेस दुकानातील चक्क सीसीटीव्हीचे फुटेज असलेला बॉक्सच चोरून नेला.शहरातील व्यापारी अलोक नानावटी यांची महात्मा गांधी मार्गावर मॅजेस्टीक टॉकीजलगत अभय एजन्सी आहे. बुधवारी रात्री ९ वाजता दुकान बंद करून नानावटी घरी गेल्यानंतर चोरट्यांनी दुकानाचे पाठीमागील शटर व चॅनलगेट तोडून आत प्रवेश केला. त्यांनी दुकानातील गल्ला फोडला. त्यात सात हजार रूपये काढून घेतले. दुकानातील इतर महागड्या एकाही वस्तुला हात न लावता सीसीटीव्ही केमेऱ्याच्या सर्व वायरींग तोडून कॅमेऱ्याचे फुटेज असलेला बॉक्सच चोरून नेला. यापूर्वी २ मे २०१४ रोजी अशाच पद्धतीने हे दुकान फोडण्यात आले होते. त्यावेळी चोरट्यांनी रोख रक्कमेसह साडेचार लाखाचा ऐवज चोरून नेला होता. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नसताना बुधवारी रात्री पुन्हा चोरट्यांनी दुकान फोडून पोलिसांसमोर आव्हान उभे केले. (वार्ताहर)