नांदेड : शहरातील विजयनगर हाऊसिंग सोसायटी भागात कपाटातील पैसे आणि मोबाईल चोरल्यानंतर महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकाविण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला रहिवाशाने पकडले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला़रमेश जगदिशराव चावरे हे १५ जुलै रोजी रात्री दीड वाजेच्या सुमारास कुटुंबियासोबत दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपले होते़ परंतु झोप येत नसल्यामुळे चावरे हे दरवाजा बाहेरुन ओढून रस्त्यावर फिरत होते़ त्याचवेळी आरोपी कपिल सुभाषराव मराठे रा़पावडेवाडी नाका हा आपल्या घरात शिरत असल्याचे चावरे यांच्या लक्षात आले़ त्यांनी चोरटा कपिलचा पाठलाग केला़ यावेळी कपिलने कपाटातील २५० रुपये, मोबाईल व चावरे यांची पत्नी वैशाली यांच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला़ तोच चावरे यांनी त्याला मुद्देमालासह पकडले़ त्यानंतर पोलिसांना माहिती देवून चोरटा कपिल याला त्यांच्या ताब्यात दिले़ याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी कपिल मराठे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला़मुलीचा विनयभंगशहरातील विष्णूनगर भागात अल्पवयीन मुलगी एकटी घरात असताना आरोपी रवि कांबळे हा घरात शिरला़ यावेळी त्याने मुलीचा वाईट उद्देशाने हात धरुन तिचा विनयभंग केला़ याप्रकरणी पिडीत मुलीने शिवाजीनगर ठाण्यात तक्रार दिली असून रवि कांबळे याच्याविरोधात गुन्हा नोंद झाला़ (प्रतिनिधी)
चोरट्याला मुद्देमालासह पकडले
By admin | Updated: July 17, 2014 00:22 IST