शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
2
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
3
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
4
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
5
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
6
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
7
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार
8
रोहित शर्माने खरेदी केली Lamborghini, नंबरने वेधले चाहत्यांचे लक्ष; काय आहे ३०१५ चा अर्थ?
9
ट्रम्प टॅरिफचा पहिला फटका, अनेक कारखान्यांत काम बंद, भारतातील व्यापार गेला पाकिस्तानात
10
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
11
Video : भर पावसात बाबांचा स्वयंपाक, चिमुकल्यांनी डोक्यावर धरलं 'असं' छत, पाहून डोळ्यांत येईल पाणी! 
12
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
13
कियारा अडवाणीच्या बिकिनी सीन्सवर कात्री? 'वॉर २'ला प्रमाणपत्र देताना सेन्सॉर बोर्डाचे निर्देश
14
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
15
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
16
सर्वाधिक धावा कुटल्या, मग कर्णधाराला माघारी धाडलं, २२ वर्षांच्या ऑलराउंडरने जिंकवला सामना
17
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
18
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
19
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
20
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर

...‘ते’ आपल्यासोबत आज राहिले असते

By admin | Updated: January 4, 2016 00:24 IST

औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे.

औरंगाबाद : सर सलामत तो पगडी पच्चास, अशी म्हण हिंदीमध्ये रूढ आहे. त्यामुळे डोके सुरक्षित राहण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. घात-अपघातात डोक्याला मार लागल्यास मृत्यूचा धोका ८० ते १०० टक्क्यांपर्यंत असतो. संभाव्य अपघाताचा धोका टाळण्यासाठी दुचाकीस्वारांनी हेल्मेट वापरावे, असा नियम करण्यात आलेला आहे. असे असताना या नियमाकडे दुर्लक्ष करणाऱ्या १०२ दुचाकीस्वारांना अपघातात मृत्यूला सामोरे जावे लागले. त्यांनी जर हेल्मेट परिधान केले असते तर २०१६ हे नवे वर्ष ते आपल्या कुटुंबियांसोबत साजरे करू शकले असते. औरंगाबादच्या पाच औद्योगिक वसाहतींमध्ये आता दिल्ली, मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरची भर पडली आहे. वाढत्या औद्योगिकरणासोबत शहराचा चोहोबाजूने झपाट्याने विस्तार होत असून, त्यासोबतच शहराची लोकसंख्याही १५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. वाढत्या लोकसंख्येसोबत औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागातील दुचाकींची संख्या तब्बल साडेसात लाखांपर्यंत पोहोचली आहे. जिल्ह्यातील सुमारे पंधरा लाख नागरिक रोज दुचाकीने प्रवास करीत असतात. मात्र, यापैकी हेल्मेट वापरणाऱ्यांची संख्या मात्र नगण्य आहे. औरंगाबाद शहरात रोज सरासरी दुचाकीस्वारांचे दोन अपघात होतात. या अपघातात गंभीर जखमी होणाऱ्या आणि मृत्युमुखी पडणाऱ्या नागरिकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जानेवारी ते नोव्हेंबर-२०१५ या कालावधीत शहरात ५५३ गंभीर अपघात घडल्याची अधिकृत आकडेवारी पोलीस आयुक्तालयाकडून प्राप्त झाली. यात २७० घटना गंभीर स्वरुपाच्या होत्या तर १३८ किरकोळ स्वरुपाच्या होत्या. यातील ३१७ अपघात हे दुचाकीस्वारांचे आहेत. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्या नागरिकांच्या