औरंगाबाद : समांतर जलवाहिनीचे कंत्राट घेतलेल्या औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीने सेव्हन हिल येथील जलकुंभाखालील गोदाम लवकरच बंद करण्यात येईल, असे स्पष्टीकरण शुक्रवारी दिले. लोकमतने ‘जलकुंभाखाली गोदामाची खोली’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून कंपनी व मनपाचे लक्ष वेधले होते.जलकुंभाखाली विनापरवाना खोली बांधण्यात आली असून ती जलकुंभाखाली कशी काय बांधली, असा प्रश्न वृत्तातून उपस्थित करण्यात आला होता.यावर कंपनीने कळविले आहे की, रोजच्या दुरुस्तीकामासाठी लागणारे फावडे, टोपले, किरकोळ साहित्य, व्हॉल्व्ह आदी साहित्य तेथे ठेवण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम सुरू होताच ते गोदाम हलविण्यात येईल. शहरातील काही भागांमध्ये जलवाहिन्यांची डागडुजी करण्यासाठी तातडीने पोहोचता यावे, वेळेत दुरुस्तीचे साहित्य जावे, यासाठी ते गोदाम तेथे उभारण्यात आले आहे. जलवाहिनीचे काम संपताच कंपनी ते गोदाम दुसरीकडे स्थलांतरित करील, असे जनसंपर्क अधिकारी राहुल मोतीयले यांनी कळविले.
ते गोदाम लवकरच स्थलांतरित करणार
By admin | Updated: December 6, 2014 00:18 IST