शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
2
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
3
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
4
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
5
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
6
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
7
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
8
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
9
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
10
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
11
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
12
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
13
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
14
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
15
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
16
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
17
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
18
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
19
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
20
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला

पंढरपुरात पुन्हा दोघांना लुटले

By admin | Updated: July 6, 2014 00:35 IST

वाळूज महानगर : पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून टीसीआय कंपनीचा कॅशिअर व सुपरवायझरच्या एटीएममधून बळजबरीने १५ हजार रुपये काढल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये घडली.

वाळूज महानगर : पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून टीसीआय कंपनीचा कॅशिअर व सुपरवायझरच्या एटीएममधून बळजबरीने १५ हजार रुपये काढल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पंढरपूरमध्ये घडली. विशेष म्हणजे पोलिसांनी रात्रीच फिर्याद घेऊन आलेल्या दोघांना उद्या गुन्हा नोंदवू असे सांगून जायला सांगितले.औरंगाबाद- नगर महामार्गावर गरवारे कंपनीजवळ टीसीआय कंपनीत काम करणारे सुपरवायझर योगेशकुमार यादव (२३) व कॅशिअर संदीपकुमार शर्मा (२२, दोघेही रा. बजाजनगर) हे ४ च्या सुमारास अ‍ॅपेरिक्षाने पंढरपुरातील तिरंगा चौकात उतरले. रिक्षातून उतरताना अनोळखी तरुणाने योगेशकुमारला पाय आडवा टाकून धक्का लागण्याचे निमित्त करून त्याच्याशी वाद सुरू केला. संदीपकुमार शर्माने मध्यस्थी करताच त्या दोघांनी वादावादी वाढविली व शर्मा व यादव यांना जवळच असलेल्या बॉम्बे स्टेशनरीजवळ बांधकाम सुरू असलेल्या इमारतीनजीक घेऊन गेले. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी त्यांना त्या इमारतीत डांबून ठेवले. त्यांची अंगझडती घेतली, खिसे तपासले. शर्मा व यादव यांचे एचडीएफसी बँकेचे एटीएम कार्ड या दोघांनी धाक दाखवून काढून घेतले. संदीपकुमारच्या मानेवर एकाने चाकूने निसटता वार केल्यामुळे दोघेही घाबरून गेले. जिवे मारण्याची धमकी देत चोरट्यांनी दोघांना तिरंगा चौकातील एक्सिस बँकेच्या एटीमजवळ आणले. यातील एक जण संदीपकुमारला सोबत घेऊन एटीएम रूममध्ये गेला. दुसऱ्याने योगेशकुमारला जिवे मारण्याची धमकी देऊन गप्प बसविले. सायंकाळी ४.२० मिनिटांनी एकाने संदीपकुमारच्या एटीएम कार्डद्वारे ३ हजार काढून घेत त्या दोघांना एका रिक्षात बसवून शहराकडे नेले. बाबा पेट्रोल पंपावरील एचएफडीसी बँकेच्या एटीममधून एकाने यादवच्या खात्यातून १० हजार व संदीपकुमारच्या खात्यावरून आणखी २ हजार रुपये काढले. शस्त्राच्या धाकावर त्या दोघांनी शर्मा व यादवच्या खिशातील रोख १ हजार रुपये व योगेशकुमारचा मोबाईल हिसकावून घेतला.शनिवारी सकाळी ही घटना प्रसिद्धी माध्यमांना समजली. सर्वत्र चर्चा सुरू झाल्यामुळे प्रकरण अंगलट येऊ नये म्हणून आज दुपारी योगेशकुमारच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध १५ हजार रुपये लुटल्याचा गुन्हा दाखल झाला.वाळूज औद्योगिक परिसरात गेल्या महिनाभरापासून दरोडेखोर व चोरट्यांचेच जणू राज्य आहे. पंढरपुरातील उद्योग आयकॉन या कॉम्प्लेक्समध्ये दोन सुरक्षारक्षकांना मारहाण करीत डांबून ठेवून चोरट्यांनी ६ दुकाने फोडली होती. याच कॉम्प्लेक्समधील मणप्पुरम या सोने तारण ठेवणाऱ्या बँकेची तिजोरी न फुटल्यामुळे जवळपास २ कोटी रुपयांचे सोने वाचले होते. पंढरपुरातील भाजीमंडईत निसार शेख या तरुणावर गोळीबार करून फरार झालेले हल्लेखोर अद्यापही सापडलेले नाहीत. सिडको वाळूज महानगरातही दोन घरे फोडून चोरट्यांनी एक लाखाचा ऐवज लांबविला होता. याच परिसरात शिक्षिकेच्या गळ्यातील मंगळसूत्रही चोरट्याने लांबविले होते. ३ जुलै रोजी पोलीस ठाण्यासमोरच टान्सपोर्टच्या कर्मचाऱ्याला दिवसा मारहाण करून चोरट्यांनी ४० हजार रुपये लुटले होते. तिरंगा चौक बनले लुटमारीचे केंद्रपंढरपुरातील तिरंगा चौक लुटमारीचे केंद्र बनले असून, आतापर्यंत या ठिकाणी तीन गंभीर गुन्हे घडले आहेत. विशेष म्हणजे औद्योगिक क्षेत्राचे तिरंगा चौक हे प्रवेशद्वार असून, या चौकात रात्री उशिरापर्यंत वर्दळ असते. या ठिकाणी वाहतूक शाखेचे कर्मचारी तसेच सीसीटीव्ही कॅमेरे बसवूनही गंभीर गुन्हे वाढतच आहेत. या चौकात बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरेही बंद पडले आहेत. भाड्यासाठी दिले १०० रुपयेया दोघांना लुटल्यानंतर चोरट्यांनी दोघांकडील ३० रुपये घेऊन त्यांना घरी जाण्यासाठी १०० रुपये भाड्यासाठी दिल्याचे शर्मा व यादव यांनी सांगितले. हे दोघे कर्मचारी घरी परतले. त्यांनी हा प्रकार आपल्या वरिष्ठांना सांगितला. रात्रीच त्यांनी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात घटनाक्रम सांगितला. दुसऱ्या दिवशी गुन्हा दाखल करू, असे सांगून त्यांना पोलिसांनी परत पाठविले.