शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

चोरीचा गुटखा घेणाऱ्या चौघांना लुटले

By admin | Updated: May 20, 2017 00:46 IST

शिराढोण : कमी पैशात गुटख्याची खरेदी करण्यास गेलेल्या चौघांकडील पावणेपाच लाखाची लूट सहा इसमांनी केली़

लोकमत न्यूज नेटवर्कशिराढोण : कमी पैशात गुटख्याची खरेदी करण्यास गेलेल्या चौघांकडील पावणेपाच लाखाची लूट सहा इसमांनी केली़ ही घटना १८ मे रोजी सायंकाळी नागझरवाडी- तडवळा मार्गावर घडली़ दरम्यान, घटनेनंतर चौघांनी दरोडा पडल्याचा बनव करीत पोलिसांना जिल्ह्यात नाकाबंदी करायला भाग पाडले़ या प्रकरणातील सत्य पोलिसांसमोर आल्यानंतर वरील चौघांसह सहा जणांविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे़पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नागझरवाडी-तडवळा रोडवर यातील आरोपींनी कमी पैशात गुटखा देतो म्हणून बोलावून घेतले होते़ गुटखा खरेदी करण्यासाठी महारुद्र काळे, सचिन डोके, विराज बागडे, रोहित काळे हे गेले़ त्यावेळी तेथे असलेल्या सहा जणांनी चौघांकडील ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम व मोबाईल लंपास घेऊन पळ काढला़ कमी पैशात गुटखा खरेदी करण्यासाठी गेल्यानंतर जवळपास पावणेपाच लाखाची लूट झाल्यानंतर त्या चौघांनी पोलिसांना सत्य परिस्थिती न सांगता दरोडा टाकल्याचा बनाव करीत माहिती दिली़ पोलिसांना घटनास्थळावरील वाहन (क्र.एम.एच.१२ एफ.सी. ५५६९) व कार (क्र.एम.एच.०४ ई एफ ४३६६) व जीप क्र. (एम.एच.२५ आर १०५७) या वाहनांचे क्रमांक सांगितले़ पोलिसांनी घटनेचे गांभीर्य पाहून जिल्ह्यात नाकाबंदी केली़ मात्र, पोलिसांच्या तपासात चौघांची लूट झाली असून, ते कमी पैशात गुटखा खरेदीस गेल्याचे समोर आले़ याप्रकरणी पोलीस नाईक विजय ज्ञानदेव गणापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपी महारुद्र काळे (रा. घोडका राजुरी ता. बीड), सचिन डोके (रा. पारगाव), विजय बागडे (रा. भूम), रोहित काळे (रा. चौसाळा, ता.बीड) या चौघांसह भुऱ्या शिंदे, पापा शिंदे (रा. बोरखेड लोणी), धनाजी शिंदे (रा. मोहा), सचिन काळे (रा. कळंब), झिंग्या काळे (रा. नागझरवाडी), हिरा काळे (रा. मोहा) यांच्याविरूध्द शिराढोण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सपोनि संजीवन मिरकले हे करीत आहेत.