शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांडपाण्याचा प्रश्न लागणार मार्गी

By admin | Updated: May 23, 2017 00:14 IST

जालना : शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार (मलनिस्सारण) योजना राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात येणार आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहरातील सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी भूमिगत गटार (मलनिस्सारण) योजना राबविण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात ६८ कोटी रुपये खर्चाची कामे हाती घेण्यात येणार आहेत. याची निविदा लवकरच काढण्यात येणार आहे. केंद्र शासन पुरस्कृत अमृत अभियानातून हा मलनिस्सारण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे.शहरातील सांडपाण्यावर या प्रकल्पातून प्रक्रिया होणार असल्याने हा प्रकल्प महत्त्वाकांक्षी आहे. विस्तार पाहता शहरातून सुमारे चारशे किमी भूमिगत गटार योजना राबविण्यात येणार असून, यातून ५० एमएलडी सांडपाणी दररोज वाहून जाण्याची क्षमता असणार आहे. यासाठी डी. आय पाईपसोबतच अन्य पाईपचा वापर करण्यात येणार आहे. जमिनीत अडीच ते फुट खोलीवर सदर पाईप असणार आहेत. शहरातील मलनिस्सारण प्रकल्पास २०१६-२०१७ आर्थिक वर्षात प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. या प्रकल्पातंर्गत प्रामुख्याने कामाचा सर्व्हे, मेन टँक, वेट वेल, समांतर पूल, समांतर रस्ता, प्रक्रिया प्रकल्प, पंम्पिंग मशनरी, सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ५० एमएलडीचा प्लांट उभारण्यात येणार आहे. सोबतच नाल्यांचे बांधकाम व दुरूस्ती करण्यात येणार आहे. यासाठी ६८ कोटींची मंजुरी मिळाली आहे. मलनिस्सारण प्रकल्प २४ महिन्यांत पूर्ण करावयाचा असल्याचे पालिकेतील अधिकाऱ्यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार असणार आहे.