शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

शंभर गावे २६२ वाड्यांवर टंचाई

By admin | Updated: August 12, 2014 01:56 IST

बीड: सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उद्भव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गत तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने राज्यकर्त्यांपासून ते प्रशासनापर्यंत

बीड: सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उद्भव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गत तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने राज्यकर्त्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांच्या समोर टंचाईवर मात करण्याचे आवाहन उभा ठाकले आहे. आज स्थितीत आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात १०९ गावे तर ७२ वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरी बीड जिल्ह्यात पिके जगण्यापुरता देखील पाऊस झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात भेडसवू लागली आहे. आज स्थितीत या तीन तालुक्यांत जिल्हा प्रशासनाने ५९ बोअर तर ३७ विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. यापुढील काळात पाऊस पडला नाही तर ज्या बोअर व विहिरींना पाणी आहे. त्या अधिग्रहीत कराव्या लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे पाऊस झाला नाही तर ज्या ठिकाणचे पाण्याचे उद्भव प्रशासनाने अधिग्रहीत केले आहेत. ते देखील आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील १ लाख ७१ हजार २८६ नागरिकांना प्रशासन पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करत आहे. वरील तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प भरण्याइतका पाऊस पुढील आठ-दहा दिवसात नाही पडला तर गाव व वाड्यांच्या संख्येत दुप्पटीने भर पडणार असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)