शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय क्रीडा संकुलात खेळाडूंना पिण्यासाठी पाणीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2018 01:00 IST

: विभागात क्रीडा संस्कृती रुजावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावे या उदात्त हेतूने शासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु या हेतूला मात्र तडा गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता उन्हाळा सुरूझाला आहे आणि त्यामुळे कसून सराव करीत असताना पाणी पिण्याची गरज खेळाडूंना असते; परंतु विभागीय क्रीडा संकुलावर पिण्याचे पाणीच नसल्यामुळे चक्क महिला पालकांनीच याविषयी पुढाकार घेतला असून त्यांनी याविषयी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना सोमवारी सायंकाळी एक लेखी निवेदन दिले आहे.

ठळक मुद्देपालक संतप्त : क्रीडा उपसंचालकांना दिले लेखी निवेदन

औरंगाबाद : विभागात क्रीडा संस्कृती रुजावी आणि राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू घडावे या उदात्त हेतूने शासनातर्फे विभागीय क्रीडा संकुलाची उभारणी करण्यात आली आहे; परंतु या हेतूला मात्र तडा गेल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. विशेष म्हणजे आता उन्हाळा सुरूझाला आहे आणि त्यामुळे कसून सराव करीत असताना पाणी पिण्याची गरज खेळाडूंना असते; परंतु विभागीय क्रीडा संकुलावर पिण्याचे पाणीच नसल्यामुळे चक्क महिला पालकांनीच याविषयी पुढाकार घेतला असून त्यांनी याविषयी क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांना सोमवारी सायंकाळी एक लेखी निवेदन दिले आहे.या लेखी निवेदनात पालकांनी त्याच्या निवेदनात म्हटले की, विभागीय क्रीडा संकुलात हजारो खेळाडू विविध खेळांचा सराव करतात; परंतु सरावादरम्यान त्यांना तहान लागल्यास कोठेही पाण्याची सोय नाही, तसेच सराव करताना दुखापत झाल्यास प्राथमिक उपचार पेटीही तेथे उपलब्ध नसते. पाणी नसल्यामुळे खेळाडूंची प्रचंड गैरसोय होत आहे. त्याचप्रमाणे विभागीय क्रीडा संकुलात शौचालये आहेत; परंतु तेथे स्वच्छता नसते आणि पाणीही नसते. अ‍ॅथलेटिक्स मैदानावर सायंकाळी सराव करताना लाईट नसतो. तसेच तेथे असणाºया नाल्यांवरील ढापे तुटलेले आहेत. त्यामुळे खेळाडूचे अपघात होण्याची जास्त शक्यता आहे. या निवेदनावर ९२ पालकांच्या स्वाक्षºया आहेत.पाणीपट्टी न भरल्याने होतेय खेळाडूंची गैरसोयमहानगरपालिकेने विभागीय क्रीडा संकुलाला पाण्यासाठी व्यावसायिक दर लावले आहे आणि दर अधिक असल्यामुळे विभागीय क्रीडा संकुलाने मनपाची पाणीपट्टीची पूर्ण रक्कम भरली नाही. तथापि, याविषयी क्रीडा आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांच्याशी चर्चा केली असून, विभागीय क्रीडा संकुलाला पाणी हे व्यावसायिक दराने देऊ नये, असे सांगितले आहे. याविषयी आपण मनपा आयुक्तांची भेट घेतली आहे. पाण्याच्या अभावामुळेच खेळाडूंची गैरसोय होत आहे आणि शौचालयेही स्वच्छ नाहीत. ही गैरसोय लवकरच दूर करण्यात येणार आहे. तसेच मैदानावर लाईटची व्यवस्था केली जाईल आणि अ‍ॅथलेटिक्स मैदानावरील तुटलेले ढापे लवकरच बदलण्यात येईल, असे क्रीडा उपसंचालक राजकुमार माहादावाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.