शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अटल सौर कृषीपंप योजनेची प्रसिद्धीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2017 00:30 IST

राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी या योजनेची प्रभावी जनजागृती व प्रसिद्धी करावी व अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : राज्य शासनाने शेतकºयांना सौरकृषी पंप वितरित करण्याची योजना जाहीर केली. मात्र या योजनेची जनजागृती व प्रसिद्धीच झाली नाही. गरजू शेतकºयांपर्यंत माहिती पोहोचण्यापूर्वीच सौरपंपासाठी अर्ज सादर करण्याची तारीखही संपली. त्यामुळे गरजू शेतकºयांना लाभ देण्यासाठी या योजनेची प्रभावी जनजागृती व प्रसिद्धी करावी व अर्ज भरण्याची मुदत वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे. आपले सरकार पोर्टलवर तक्रार करून योजनेची मुदत वाढविण्यासाठी साकडे घालण्यात आले आहे.महाराष्टÑ शासनाने अपारंपरिक उर्जा निर्मिती व अपारंपरिक उर्जा स्त्रोताचा विकास व प्रोत्साहन देण्यासाठी सौर उर्जेवर आधारित सौरऊर्जा कृषीपंप अनुदानावर शेतकºयास देण्याची योजना जाहीर केली आहे. या योजनेतंर्गत दहा एकराच्या आतील पात्र शेतकºयांना ९५ टक्केपर्यंत अनुदानावर सौरऊर्जा कृषीपंप मिळणार आहे.हिंगोली जिल्ह्यात ही योजना आहे. जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती या योजनेतील लाभार्थी निवडणार आहे. मात्र या योजनेची प्रसिद्धी किंवा जनजागृतीच झाली नाही.शेतकºयांपर्यंत योजनाची माहिती पोहोचण्यापूर्वीच लाभार्थींचा अर्ज घेण्याची प्रक्रिया संपल्याने आता शेतकºयांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याबाबत वसमत तालुक्यातील गुंज येथील उपसरपंच प्रकाश नरवाडे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार केली. यात सौरऊर्जा कृषीपंप योजनेची माहितीच महावितरणने शेतकºयांना होऊ दिली नसल्याचे नमूद केले आहे. गरजू शेतकºयांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी योजनेची व्यापक प्रसिद्धी करावी व अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी प्रकाश नरवाडे यांनी केली आहे.सौरऊर्जा कृषीपंप योजना जाहीर न होताच लाभार्थ्यांची अर्जाची गर्दी झाली हे तर राजकीय शेतकरी किंवा राजकारणाच्या मर्जीतील कार्यकर्तेच असावेत, अशी शंकाही प्रकाश नरवाडे यांनी व्यक्त केली आहे.