शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीला विरोध नाही, पण शाश्वत योजनांवर भर

By admin | Updated: April 14, 2017 01:01 IST

लातूर :उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास आमचे सरकार करीत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले.

लातूर : शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला $ि$िवरोध नाही. मात्र शेतकरी कर्जबाजारीच होऊ नये, यासाठी शाश्वत उपाययोजनांवर आमच्या सरकारचा भर आहे़ तरीही उत्तर प्रदेशात झालेल्या कर्जमाफीचा अभ्यास आमचे सरकार करीत असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी येथे सांगितले. महापालिका निवडणुकीच्या प्रचारार्थ लातूर दौऱ्यावर आलेल्या खा. रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली. पंचायत ते पार्लमेंट हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न आहे. यापूर्वी स्थानिक पातळीवर यश मिळत नव्हते. परंतु, केंद्रात सत्ता आल्यापासून ग्रामपंचायत, नगरपालिकेतही यश मिळत आहे. राज्यात तब्बल अडीच हजार सरपंच भाजपाचे आहेत. तर नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वाधिक १० अध्यक्ष भाजपाचे झाले़ स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात असणे आवश्यक आहे. त्याशिवाय, प्रश्न सुटत नाहीत. लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला मिळत असलेल्या यशाचे गमक काय? यावर खा. दानवे म्हणाले, आम्ही लोकांच्या मनात विश्वास निर्माण करण्याचे काम केले आहे. निवडणुका कशा जिंकाव्यात, यासाठी तब्बल १ लाख कार्यकर्त्यांना तीन दिवस मुक्कामी प्रशिक्षण दिले. यात राज्य व केंद्र शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहोचविण्याची माहितीही त्यांना देण्यात आली. कार्यकर्त्यांचे संघटन असल्यास काहीही शक्य आहे़