शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

‘पीटलाईन’शिवाय नवी रेल्वे नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2017 00:26 IST

चिकलठाणा येथे पीटलाईन बनविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीटलाईनसाठी २४ रेल्वे बोगींची जागा आवश्यक असून, प्रत्यक्षात चिकलठाण्यात २० बोगींएवढीच जागा आहे. भविष्यात रेल्वेला २४ पेक्षा अधिक बोगी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जागेअभावी चिकलठाणा येथील पीटलाईन बारगळण्याचे संकट निर्माण झाले. परिणामी नव्या रेल्वेचा प्रवासही अवघड होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : चिकलठाणा येथे पीटलाईन बनविण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेकडून प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. पीटलाईनसाठी २४ रेल्वे बोगींची जागा आवश्यक असून, प्रत्यक्षात चिकलठाण्यात २० बोगींएवढीच जागा आहे. भविष्यात रेल्वेला २४ पेक्षा अधिक बोगी वाढण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे जागेअभावी चिकलठाणा येथील पीटलाईन बारगळण्याचे संकट निर्माण झाले. परिणामी नव्या रेल्वेचा प्रवासही अवघड होईल.चिकलठाणा येथे पीटलाईन करण्यासाठी ११ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. रेल्वे बोर्डाकडून मंजुरी मिळाल्यानंतर वर्षभरात पीटलाईनचे काम पूर्ण होईल. या एका पीटलाईनमुळे किमान तीन ते चार नव्या रेल्वे सुरू होतील, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार यादव यांनी सप्टेंबरमध्ये औरंगाबाद दौºयात दिली होती. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाचे व्यवस्थापक (डीआरएम) त्रिकालज्ञ राभा यांनी बुधवारी चिकलठाण्यात पीटलाईनच्या जागेची पाहणी केली. या पाहणीत पीटलाईनसाठी जागेची असलेली अडचण त्यांच्यासमोर आली.गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबादहून दिल्ली, मुंबईसाठी नव्या रेल्वे सुरू होण्याची मागणी होत आहे. नवीन रेल्वे सुरूकरताना सुरक्षेच्या दृष्टीने देखभाल-दुरुस्ती महत्त्वाची आहे. पूर्णा येथील पीटलाईनवरून देखभाल-दुरुस्ती करून रेल्वे औरंगाबादला आणणे शक्य नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे नव्या रेल्वेची प्रतीक्षा औरंगाबादकरांना करावी लागत आहे. चिकलठाणा येथे पीटलाईन करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला. यासाठी प्रारंभी जमीन, रेल्वे कनेक्टिव्हिटी आणि पाण्याची सुविधा असल्याचे सांगण्यात आले; परंतु त्यात आता जागेची अडचण असल्याचे सांगितले जात आहे. सध्या किमान २४ बोगींची रेल्वे धावते. त्यामुळे ४ बोगींसाठी एक एकर जागेची रेल्वेला आवश्यकता आहे. पीटलाईनअभावी नव्या रेल्वेसाठी आणखी वाट पाहण्याची वेळ प्रवाशांवर येणार असल्याचे दिसते.औरंगाबादेतच पीटलाईनपीटलाईनचा प्रस्ताव गेलेला आहे. त्यात २० बोगींची जागा असल्याचे नमूद आहे. हा प्रस्ताव प्रारंभी अवस्थेत असून, रेल्वे मंत्रालय निर्णय घेईल. चार बोगींच्या जागेसाठी ९० मीटर म्हणजे जवळपास एक एकर जागेची आवश्यकता आहे. राज्य सरकारकडून जमीन मिळाली नाही तर तसेच काम चालविले जाईल. तरीही काही अडचण आली तर औरंगाबादेत अन्य जागेत पीटलाईन केली जाईल. कुठेना कुठे पीटलाईन होईल.- त्रिकालज्ञ राभा, डीआरएम, नांदेड, दक्षिण मध्य रेल्वे