शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

देवाला गाभाऱ्यात जावून भेटण्याची गरज नाही

By admin | Updated: April 25, 2016 00:35 IST

नळदुर्ग : स्त्री ही निर्मितीची जनक असून, तिच्यातच दैवी शक्ती व देवपण आहे. त्यामुळे महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जावून देवाला भेटण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते,

नळदुर्ग : स्त्री ही निर्मितीची जनक असून, तिच्यातच दैवी शक्ती व देवपण आहे. त्यामुळे महिलांनी मंदिराच्या गाभाऱ्यात जावून देवाला भेटण्याची आवश्यकता नाही, असे मला वाटते, असे मत ज्येष्ठ गायिका तथा सूर्योदय परिवाराच्या महाराष्ट्र अध्यक्षा अनुराधा पौडवाल यांनी तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे व्यक्त केले. राष्ट्रसंत भैय्यू महाराज यांच्या जलअभियान सूर्योदय परिवार, यमुना मिशन, मथुरा ट्रस्ट व खुदावाडी ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने खुदावाडी येथील शिवारातील ओढ्याच्या पात्राचे रुंदिकरण, गाळ काढणे, व खोलीकरण कामाचे उद्घाटन प्रदीप बन्सल व अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. नाला रुंदिकरण कामाच्या शुभारंभानंतर अनुराधा पौडवाल यांच्या हस्ते खुदावाडी गावात गरजुंना वस्त्र व शिधा वाटप करण्यात आला.यावेळी पौडवाल म्हणाल्या, स्त्रीपुढे देवदर्शनाशिवाय अनेक महत्वाची कामे व कौटुंबिक समस्या आहेत. त्या सोडविण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्यास त्यांच्या प्रत्येक कृतीतून परमेश्वर दिसेल. खुद्द देवाचा देव महादेवाने सुद्धा स्त्री शरीराचे अर्धांग स्वीकारलेले आहे. यावरून स्त्रीचे महत्व व महात्म्य दिसून येते, असेही त्या म्हणाल्या. शहरात ट्राफीक, वायू प्रदुषण, कृत्रिमरित्या/रासायनिक खताचा वापर करून निर्माण केलेल्या भाजीपाला व महागाईच्या समस्या आहेत. ग्रामीण भागात दुष्काळ, पाणीटंचाई, पक्के रस्ते, नाल्या, आदीनी रौद्ररुप धारण केल्याचे दिसते. यावर सर्वांनी एकत्रित येवून मात करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यावेळी मिशन मथुराचे संस्थापक प्रदीप बन्सल, यमुनाचे संयोजक पंडित शर्मा, सूर्योदयचे श्रीकांत चव्हाण, माजी सरपंच डॉ. सिद्रामप्पा खजुरे, उपसरपंच शिवप्पा जवळगे, कैलास चिनगुंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन मनोहर घोडके तर प्रास्ताविक डॉ. सिद्रामप्पा खजुरे यांनी केले. कैलास चिनगुंडे यांनी आभार मानले. यावेळी साहेबराव घुगे, बालाजी मोकाशे आदी उपस्थित होते.