पुरुषोत्तम करवा , माजलगावमाजलगाव धरणापासून ३ किमी अंतरावर असलेल्या ३५० उंबऱ्याच्या मनूरवाडी येथे ४-५ वर्षांपासून पाण्याची गंभीर परिस्थिती आहे. मात्र, सातत्याने दुर्लक्ष झाले. परिणामी यावर्षी जानेवारीतच पाण्याची परिस्थिती बिकट झाली. गावकऱ्यांना हंडाभर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. सकाळपासून गावाबाहेरील विहिरीवर बैलगाड्यांसह लोकांच्या रांगा लागतात.माजलगाव शहरापासून ४ कि.मी. तर माजलगाव धरणापासून ३ कि.मी. अंतरावर असलेल्या मनूरवाडी येथे ३५० घरे असून गावाची लोकसंख्या तीन हजार आहे. या गावात १२ ते १५ हातपंप व विहिरी आहेत. मात्र हे सर्व जलस्त्रोत आटल्याने पाणिटंचाई निर्माण झाली आहे. मागील ३-४ वर्षांपासून अशीच परिस्थिती असून ग्रामस्थ त्रस्त आहेत. मनूरवाडीच्या ग्रामपंचायतीने दोन महिन्यापूर्वीच टँकरची मागणी केली होती; परंतु हे टँकर १५ दिवसांपूर्वी चालू झाले. टँकर दोनच खेपा करत असून ते ही गावाऐवजी गावाबाहेर उभा केले जाते. त्यामुळे गावातील आबालवृद्धांना पाण्यासाठी धावपळ करावी लागते. यातून विद्यार्थीही सुटले नाहीत. त्यांना दप्तर खुंटीला टांगून पाण्यासाठी पळावे लागते. ४टँकर वेळेत येत नसल्यामुळे काम सोडून त्याची वाट पहात बसावे लागते, असे बबन मोरे यांनी सांगितले.माझ्याकडे सहा गावांचा कारभार असल्यामुळे मनूरवाडीकडे लक्ष द्यायला माझ्याकडे वेळ नसतो. आठवड्यातून एकदा मी मनूरवाडीला जातो. भारत निर्माणचे काम अंदाजपत्रकानुसारच झाले असून टँकरचे पाणी गावातील विहिरीत सोडण्यासाठी रस्ता दुरूस्त करण्यात येईल, असे ग्रामसेवक एन. पी. मोरे यांनी सांगितले.... तर नियोजन शक्य४टँकर रस्त्यावर उभे केल्यामुळे अर्ध्या गावाला पाणी मिळतच नाही. सदस्यांना ग्रामसेवक व सरपंच विचारात घेत नसल्यामुळे नियोजन होत नाही, असे एका ग्रामपंचायत सदस्याने सांगितले. १९७२ ला देखील पाण्याची अशी परिस्थिती नव्हती. नियोजनाच्या अभावामुळे गावात पाण्याची भयानक परिस्थिती आहे.- पंडित शिंदे, मजूरआम्हाला शेतातील कामे सोडून २ कि.मी.वरून पाणी आणावे लागते. यामुळे शेतीच्या कामावर परिणाम झाला आहे. - चत्रभूज पवार, शेतकरीटँकरने आणलेले पाणी पिण्यायोग्य नसते. मात्र, गावात पाणीच नसल्यामुळे मिळेल त्या पाण्याने तहान भागविण्याशिवाय पर्याय नाही. पाणी आणण्यासाठी दूर जावे लागते. - गोविंद शिंदे, ग्रामस्थयोजनेची विहीर कोरडी पडल्याने गाव तहानलेले आहे. सध्या टँकर सुरु असून, गावकरी टँकरचे पाणी शिस्तीत भरत नसल्याने पाणी पुरत नाही. - कौशल्या दशरथ थोरात, सरपंचगेल्या काही वर्षांपासून गावाला पाणिटंचाईची समस्या भेडसावत आहे. यापूर्वी उन्हाळ््याच्या अखेरच्या टप्प्यात ही समस्या उद्भवत असे. मात्र, आता जानेवारीतच विहीरी तळ गाठू लागल्या आहेत. पुढच्या पिढीची चिंता वाटते. - अनंत जगताप, ग्रामस्थपाणीटंचाईने गावचे जनजीवन विस्कळीत केले आहे. पाणी मिळविणे हाच सर्वांचा प्राधान्यक्रम बनला आहे. त्यामुळे शेतातील कामे, मुलांची शाळा, पाहुण्यांची सरबराई यासह दैनंदिन कामांवर परिणाम झाला आहे. ४सकाळ होताच इतर सर्व कामे सोडून पाण्यासाठी धावपळ करावी लागत आहे.
उजाडता मावळता पाण्याचीच चिंता
By admin | Updated: February 1, 2015 00:36 IST