शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

९३० ग्रा.पं.चा जमाखर्च हिशेबच नाही

By admin | Updated: September 2, 2014 01:49 IST

रामेश्वर काकडे , नांदेड सप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप जिल्ह्यातील ९३० ग्रामपंचायतींनी आपल्या जमा-खर्चाचा डाटा प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये भरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे

रामेश्वर काकडे , नांदेडसप्टेंबर महिना उजाडला तरी अद्याप जिल्ह्यातील ९३० ग्रामपंचायतींनी आपल्या जमा-खर्चाचा डाटा प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये भरलाच नसल्याची माहिती समोर आली आहे. यावरुन आपण केलेल्या गैरव्यवहाराचा बिगूल फुटेल या भीतीने बहुतांश ग्रामपंचायतींनी ही माहिती दडविल्याची शक्यता आहे.जिल्ह्यात एकूण १३०९ ग्रामपंचायती असून या सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने महाआॅनलाईन जोडण्याची प्रक्रिया सुरु आहे. यासाठी स्वतंत्र संग्राम कक्षामार्फत जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती संगणकाद्वारे इंटरेनटने जोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यामुळे ग्रामस्थांना गावातच सर्व प्रकारचे कागदपत्रे उपलब्ध होऊन त्यांचे काम सुकर होण्याचा उद्द्ेश आहे. परंतु बहुतांश ग्रामपंचायती तसेच ग्रामसेवकांच्या उदासीनतेमुळे या कामामध्ये अडथळा निर्माण होत आहे.एकूण १३०९ ग्रामपंचायतींपैकी इंटरनेटची सोय असलेल्या केवळ २५० ग्रामपंचायत स्तरावर महाआॅनलाईन जोडणी दिलेली आहे. यासाठी ८४२ आॅपरेटरची नेमणूक करण्यात आलेली आहे. एक हजार लोकसंख्येच्या ग्रामपंचायतीसाठी एक स्वतंत्र आॅपरेटर तर एक हजारपेक्षा कमी लोकसंख्या असेल तर तीन गावासांठी मिळून एका आॅपरेटरची नेमणूक केलेली आहे. पंचायत विभागामार्फत सर्वच ग्रामपंचायतींना संगणक पुरविण्यात आले परंतु जागेअभावी बहुतांश संगणक ग्रामसेवक किंवा सरपंचाच्या घरी ठेवण्यात आले आहेत.महाआॅनलाईनच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या प्रिया स्वॉफ्ट या अज्ञावलीमध्ये गावाची मालमत्ता, अ‍ॅसेंट डिरेक्टरी, लोकल गव्हरमेंट डिरेक्टरी, एरिया प्रोफाईल,प्लान प्लस, सर्विस प्लस, अ‍ॅक्शन स्वॉफ्ट, सोशल अ‍ॅडिट, ट्रेनिंग आणि पंचायत पोर्टल तसेच एनआयसीच्या ११ अज्ञावली यात भरल्या जातात. याशिवाय ग्रामपंचायतीने जन्म-मृत्यू असे १ ते २७ नमूने संग्राममध्ये भरले जातात. तसेच नागरी सुविधेमध्ये जन्म-मृत्यू मालमत्तेप्रमाण १९ दाखले देता येतात.याव्यतिरिक्त अपना सीएससी स्वॉफ्टवेअरमधून पॅन कार्ड, शेतकरी असल्याची नोंद, रेल्वे आरक्षण, डिस टिव्ही रिचार्ज, बस तिकीट बुकींग, मोबाईल रिचार्ज इत्यादी सेवा ग्रामपंचायतींना देता येतात. सध्या जिल्ह्यातील २५ ग्रामपंचायतींनी पुढाकार घेवून बँकेची सुविधा सुरु केली आहे. यात झीरो बॅलेंसवर खाते उघडणे, क्रेडीट डाटा यासारख्या सेवा उपलब्ध करण्यात येत आहेत. मात्र ग्रामपंचायतींच्या उदासीनतेमुळे तसेच जागेअभावी व इंटरनेट जोडणीच नसल्यामुळे शेकडो गावे महाआॅनलाईन सेवेपासून मूकत आहेत. पंचायत समितीत कॅम्प लावून जन्म नोंदणी, मृत्यू नोंदणी आणि ८ अ चा उतारा हे प्रमाणपत्र देण्याचे काम जवळपास ९५ टक्के पूर्ण झाल्याचे संग्राम कक्षाच्या सूत्रांनी सांगितले.