अकोला : जम्मू-काश्मीरमध्ये निर्माण झालेल्या महापुराच्या संकटात अनेक जण अडकून पडले आहेत. श्रीनगर येथे गेलेल्या अकोल्यातील दोघांचा गत सहा-सात दिवसांपासून संपर्क तुटला असून, दोघेही बेपत्ता असल्याची माहिती नातेवाईकांनी बुधवारी दुपारी जिल्हाधिकार्यांना दिली. यासंदर्भात जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी तातडीने राज्य नियंत्रण कक्षाला माहिती कळविली. महाराष्ट्रासह विविध राज्यातील अनेक जण पुरामुळे अडकून पडले आहेत. गत सहा-सात दिवसांपूर्वी अकोल्यातील सिंधी कॅम्पमधील रहिवासी शामलाल मुलचंद राजपाल आणि घनशामदास भगवानदास पारवानी हे दोघेही आपल्या नातेवाईकांसह श्रीनगर येथे गेले होते. ५ सप्टेंबरपर्यंत त्यांच्याशी भ्रमणध्वनीवरुन संपर्क होत होता. त्यावेळी ते श्रीनगर येथील लाल चौकमधील सनातन धर्मशाळेत मुक्कामी होते. त्यानंतर मात्र त्यांच्याशी संपर्क तुटला, अशी माहिती विनोदकुमार शामलाल राजपाल व इतर नातेवाइकांनी बुधवारी जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांना दिली.
..तर बलात्कार पीडितेला मिळू शकतो सहाच महिन्यांत न्याय
By admin | Updated: September 11, 2014 01:21 IST