शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
5
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
6
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
7
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
8
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
9
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
10
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
11
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
12
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
13
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
14
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
15
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
17
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
18
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
19
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
20
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...

तो प्र्रस्ताव स्थगित

By admin | Updated: July 20, 2014 01:00 IST

औरंगाबाद : चंपाचौक ते जालना रोडपर्यंतचा रस्ता तूर्तास होण्याची कोणतीही चिन्हे नसताना मनपाने जमीन मालक मे. मुळे ब्रदर्स यांना रस्ता करण्यापूर्वीच मोबदला देण्याचा घाट घातला होता.

औरंगाबाद : जिल्हाधिकारी कार्यालयमार्गे चंपाचौक ते जालना रोडपर्यंतचा रस्ता तूर्तास होण्याची कोणतीही चिन्हे नसताना मनपाने जमीन मालक मे. मुळे ब्रदर्स यांना रस्ता करण्यापूर्वीच मोबदला देण्याचा घाट घातला होता. मात्र, स्थायी समितीच्या आजच्या बैठकीत हा डाव उधळून लावण्यात आला. नगररचना विभागाच्या प्रस्तावाला स्थायी समितीने स्थगिती दिली. चंपाचौक ते जालना रोडपर्यंतचा रस्ता होण्यासाठी तीन वसाहतींमधील अंदाजे ९०० घरे बाधित होतात. त्या मालमत्ता ताब्यात घेणे सध्या शक्य नसताना पालिकेने एका जागेसाठी चुकीचा पायंडा पाडणारा प्रस्ताव आणला होता. स्थायी समितीसमोर भूसंपादन आणि बांधकाम परवानगी, असे दोन विषय एकत्रित करणारा हा गुंतागुंतीचा प्रस्ताव नगररचना विभागाने आणला होता. या प्रस्तावामुळे नगररचना विभागाचे दीड कोटी रुपयांचे रोख उत्पन्न बुडणार होते. जेव्हा निर्णय, तेव्हाच भूसंपादन, असा विचार करण्याऐवजी प्रशासनाने सत्ताधाऱ्यांच्या मर्जीतील पश्चिम मतदारसंघातील एका नेत्याच्या दबावावरून हा प्रस्ताव बैठकीसमोर ठेवल्याची चर्चा होती. टीडीआर, एफएसआय असा कोणताही विचार न करता पालिकेने रस्ता होण्याची कोणतेही चिन्हे नाहीत. रोख मोबदला भविष्यात देण्याच्या सवलतीपोटी बांधकाम परवानगीसाठी मिळणाऱ्या दीड कोटी रुपयांवर पाणी सोडण्याचे ठरविल्याचे यातून होते. स्थायी समितीच्या बैठकीत सर्वच सदस्यांनी या प्रस्तावावर आक्षेप घेतला. त्यामुळे या प्रस्तावाला स्थगिती देण्यात आली.काय होते प्रस्तावातसहायक संचालक नगररचना यांनी प्रस्तावात तीन मुद्दे मांडून भूसंपादन आणि मोबदला देण्याचे ठरविले होते. मोंढानाका जालना रोड येथील सीटीएस नं. १२८७८ वर २००१ च्या विकास आराखड्यानुसार आरक्षण क्रमांक २१८, २१९ हे वाहनतळ व दुकान केंद्रासाठी आहे. एकूण जागेतील २०३५ चौ. मी. क्षेत्र बाधित होत असून, ते आरक्षण ४५ व ३० मीटर रुंद विकास रस्त्यासाठी आले आहे. ती जागा मे. मुळे ब्रदर्स यांची आहे. ती एका बिल्डरला विकसित करण्यासाठी दिलेली आहे. असे होते तीन पर्याय२०१३ च्या रेडीरेकनरनुसार भूसंपादन केल्यास मनपाला ती जागा घेण्यासाठी ३ कोटी ३८ लाख ९९ हजार मुळे यांना द्यावे लागतील. सुधारित बांधकाम परवानगी घेण्यासाठी मुळे यांना १ कोटी ५८ लाख १३ हजार लागतील. ही रक्कम भूसंपादनाच्या रकमेतून वजा केल्यास १ कोटी ८० लाख ८६ हजार मुळे यांना मोबदला म्हणून द्यावेत किंवा २०१४ च्या रेडीरेकनरनुसार रस्त्यात येणाऱ्या जागेचा मोबदला ४ कोटी १० लाख होता. त्यावर्षीच्या रेडीरेकनरनुसार बांधकाम परवानगीचा दर १ कोटी ५८ लाख होतो. २ कोटी ५२ लाख मुळे यांना मोबदला देण्यात यावा किंवा भूसंपादन २०१३ च्या रेडीरेकनर दरानुसार होत असेल तर बांधकाम परवानगीदेखील २०१३ च्या दरानुसार द्यावी. मुळे यांना २ कोटी ६ लाख ८२ हजार रुपये मोबदला द्यावा, असे तीन पर्याय या प्रस्तावात होते.