शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

...तर शेतकरी पुन्हा संप करतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2018 00:05 IST

राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी शेतकºयांनी संप पुकारला होता. तेव्हा राज्य सरकारने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीशी केलेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य करत त्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला होता. मात्र, सरकारने शेतकºयांच्या एकाही मागणीची पूर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली.

ठळक मुद्देइशारा : शेतकरी सुकाणू समितीने जाहीर केली आंदोलनाची दिशा

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : राज्यातील शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीसह इतर मागण्यांसाठी शेतकºयांनी संप पुकारला होता. तेव्हा राज्य सरकारने शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीशी केलेल्या चर्चेत सर्व मागण्या मान्य करत त्याची पूर्तता करण्यासाठी अवधी मागितला होता. मात्र, सरकारने शेतकºयांच्या एकाही मागणीची पूर्तता केली नाही. यामुळे शेतकरी पुन्हा जातील, असा इशारा देत आगामी आंदोलनाची दिशा सुकाणू समितीने शनिवारी जाहीर केली.स्वामी रामानंद तीर्थ संशोधन केंद्राच्या सभागृहात शेतकरी संघटनांसह शेतीसंबंधी कार्य करणाºया सुकाणू समितीच्या सदस्यांची बैठक शनिवारी (दि.२४) पार पडली. या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते व सुकाणू समितीचे रघुनाथदादा पाटील, किशोर ढमाले, सुभाष लोमटे, एच. एम. देसरडा, सुखदेव बन, काझंमभाई, रमेश खंडागळे, मनोहर टाकसाळ, भगवान भोजने, मिलिंद पाटील, रंगनाथ येवले, कचरू वाखडे, ज्ञानेश्वर भारती आदी उपस्थित होते.सुकाणू समितीच्या सदस्यांनी सांगितले की, राज्य सरकारने सुकाणू समितीशी चर्चा करताना संपूर्ण कर्जमाफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आदी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, हे आश्वासन पाळण्यात आले नाही.यामुळे सुकाणू समितीतर्फे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात २३ मार्च ते ३० एप्रिलदरम्यान ‘किसान जनजागरण यात्रा’ काढण्यात येणार आहे. या यात्रेत स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्र लढा, शेतकरी आंदोलन, विद्यापीठ नामांतराच्या लढ्यातील शहीद आणि आत्महत्या केलेल्या शेतकºयांना अभिवादन केले जाणारआहे.सरकारला केवळ इशारा देण्यासाठी ही यात्रा काढण्यात येत आहे. या यात्रेनंतरही सरकारने शेतकºयांच्या मागण्या मान्य न केल्यास आगामी आंदोलन पहिल्यापेक्षा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. मागील वेळी शेतकरी संपावर गेले होते.या संपासारखेच तीव्र आंदोलनाचे हत्यार जून महिन्यादरम्यान काढण्यात येणार असल्याचेही सुकाणू समितीच्या सदस्यांनी सांगितले.ना कर्ज, ना करसुकाणू समितीच्या बैठकीत राज्य सरकार जोपर्यंत शेतकºयांच्या मागण्या मान्य करत नाही. तोपर्यंत शेतकरी सरकारला कोणत्याही प्रकारचे सहकार्य करणार नाही. शेतकरी कोणतेही कर, लाईट बिल आणि बँकांचे कर्ज भरणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारचे अधिकारी कर्ज वसुलीसाठी आले तरी त्यांना वसुली करू देणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.