शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

देशहित होते त्यांचे अंतिम उद्दिष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:00 IST

महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. या सगळ्यांचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत सेंद्रिय होते. ही मंडळी कधीही वैयक्तिक कारणासाठी एकमेकांशी भांडली नाहीत. देशहित हे सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट होते, पण त्यासाठीचे मार्ग वेगळे असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. या नेत्यांचे अंतरिक संबंध समजून न घेता विनाकारण त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे धारिष्ट्य करू नये, अशा शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

ठळक मुद्देविश्वंभर चौधरी : औरंगाबादेत फुले- शाहू- आंबेडकर व्याख्यानमालेस सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महात्मा गांधी, पं. नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, डॉ. आंबेडकर, सुभाषचंद्र बोस ही सगळी मंडळी स्वातंत्र्य, समता, न्याय, बंधुता या तत्त्वांवर विश्वास ठेवणारी होती. या सगळ्यांचे एकमेकांशी असलेले नाते अत्यंत सेंद्रिय होते. ही मंडळी कधीही वैयक्तिक कारणासाठी एकमेकांशी भांडली नाहीत. देशहित हे सगळ्यांचे अंतिम उद्दिष्ट होते, पण त्यासाठीचे मार्ग वेगळे असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होते. या नेत्यांचे अंतरिक संबंध समजून न घेता विनाकारण त्यांची प्रतिमा संकुचित करण्याचे धारिष्ट्य करू नये, अशा शब्दांत विश्वंभर चौधरी यांनी उपस्थितांशी संवाद साधला.देवगिरी महाविद्यालयातर्फे रविवारपासून आयोजित फुले- शाहू-आंबेडकर व्याख्यानमालेस सुरुवात झाली. याचे पहिले पुष्प गुंफताना चौधरी यांनी ‘राष्ट्रनेत्यांचे अंतरंग’ हा विषय उलगडला. यादरम्यान त्यांनी म. गांधी, पं. नेहरू, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या नेत्यांच्या अंतरिक संबंधांवर प्रकाश टाकला. अ‍ॅड. शशिकुमार चौधरी अध्यक्षस्थानी होते. पंडितराव हर्षे, त्रिंबकभाऊ पाथ्रीकर यांची व्यासपीठावर विशेष उपस्थिती होती. उपप्राचार्य डॉ. अशोक तेजनकर यांनी व्याख्यानमालेबद्दल माहिती दिली तर प्राचार्य डॉ. शिवाजीराव थोरे यांनी प्रास्ताविक केले.चौधरी पुढे म्हणाले की, या राष्ट्रनेत्यांची पिढी ही शिक्षणातून पुढे आलेली होती, ‘फ्लेक्स’मधून नव्हे. गांधी या सगळ्या नेत्यांना घेऊन पुढे जाणारे नेते होते. त्यामुळे ते एक मध्यवर्ती सूत्रधार होते. राज्यघटना या सगळ्या राष्ट्रनेत्यांना एकत्र आणणारा शेवटचा धागा होता. आज सोशल मीडियाच्या माध्यमातून या नेत्यांबद्दल अत्यंत उद्वेगजनक बोलले जाते. या नेत्यांचा इतिहास, मतभेदांचे संदर्भ नीट समजून घेऊन या नेत्यांबाबत बोला, असे आवाहनही त्यांनी या माध्यमातून के ले. पं. नेहरूंची भूमिका मांडताना ते म्हणाले की, आपल्याकडच्या एका वर्गाला आधुनिकतेचे वावडे होते आणि नेहरू हे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि विज्ञानवादी होते, त्यामुळेच त्यांना प्रखर विरोधाला सामोरे जावे लागले. त्यांचा देशाप्रतीचा दानशूरपणा कधीही समोर न येता केवळ त्यांची श्रीमंती आणि अय्याशी व्यक्तिमत्त्वाच्या गप्पाच रंगवून सांगण्यात आल्या.सुभाषचंद्र बोस आणि नेहरू यांचे हिटलरची मदत घेण्यावरून वाद होते. त्यांचे के वळ वितुष्टच समोर येते, मात्र सुभाषचंद्रांच्या निधनानंतर आझाद हिंद सेनेचे पुनर्वसन नेहरूंनीच केले ही गोष्ट सांगितली जात नाही.आंबेडकर आणि गांधी हे एकमेकांना छेद न देणारे स्वतंत्र विचारप्रवाह होते. गांधीजींना आधी स्वातंत्र्य हवे होते तर आंबेडकरांना सामाजिक सुधारणा अगोदर पाहिजे होत्या, हा त्यांच्या वादाचा मुद्दा होता.आज (दि. १२) या व्याख्यानमालेदरम्यान सायं. ५.३० वा. डॉ. मोहन आगाशे ‘दैनंदिन जीवनातील ताणतणाव : आरोग्य आणि कलाक्षेत्राचे योगदान’ या विषयावर भाष्य करणार आहेत.बुद्धीपेक्षा पुतळ्याची उंची महत्त्वाची वाटू लागलीसरदार पटेलांविषयी बोलताना चौधरी म्हणाले की, सरदार पटेलांवर खूपच अन्याय झाला, असे आज बोलले जाते. आता तर त्यांचा सगळ्यात मोठा पुतळाही उभारण्यात येत आहे. चीनचे मेटल वापरून बनविण्यात येणारा हा पुतळा प्रत्यक्षात सरदार पटेलांनाही आवडेल की नाही माहीत नाही. पण बौद्धिक उंची संपली की पुतळ्याची उंचीच मोठी वाटते, असा टोलाही त्यांनी मारला.