कचनेर तांडा नं. २ येथील शेतकरी प्रेमसिंग जगन्नाथ चव्हाण हे सोमवारी रात्री जेवण करून कुटुंबीयांसह झोपी गेले होते. चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला व पेटीत असलेले सोन्या-चांदीचे एक तोळा दागिने व रोख रक्कम २५ हजार रुपये असा एकूण त्यांचा ६५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
दुसऱ्या ठिकाणी घडलेल्या घटनेत तांडा नं. ६ येथील दिलीप छगन राठोड हे पत्नीसह घराच्या ओट्यावर झोपले होते. ही संधी साधून मध्यरात्री चोरट्यांनी त्यांच्या घरातील लोखंडी पेटीतील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम असा एकूण ६५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. त्यांची मुलगी काजल झोपेतून उठल्यानंतर घरात चोरी झाल्याचे निदर्शनात आले. राठोड व चव्हाण या दोन्ही शेतकऱ्यांनी चिकलठाणा पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार दाखल केली. यानंतर बिट जमादार शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी चिकलठाणा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि. विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बिट जमादार शिंदे हे करीत आहे.