शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

आॅईलमिलमधील चोरी; एक जण गजाआड

By admin | Updated: May 25, 2015 00:24 IST

जालना : नविन औद्योगिक वसाहतीत २२ मे रोजी पहाटे ४.२५ वाजेच्या सुमारास सद्गुरु आॅईल मिल येथे अज्ञात चोरट्यांनी घुसून ५० हजाराचा ऐवज चोरुन नेला

जालना : नविन औद्योगिक वसाहतीत २२ मे रोजी पहाटे ४.२५ वाजेच्या सुमारास सद्गुरु आॅईल मिल येथे अज्ञात चोरट्यांनी घुसून ५० हजाराचा ऐवज चोरुन नेला. याप्रकरणी कदिम जालना पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुध्द गुन्हा नोंदविला. दरम्यान, रविवारी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवित मुख्य आरोपी अर्च्या उर्फ अब्दुल फकीरा खरात (वय २५, माडी, ता.अंबड) यास गजाआड केले.राजेंद्र भरतीया यांची नवीन औद्योगिक वसाहतीत सद्गुरु आॅईल मिल आहे. येथे अज्ञात चोरट्यांनी पहाटे ४ वाजेच्या सुमारास मिलच्या पाठीमागील लोखंडी शिडीने प्रवेश करुन गच्चीवर जाऊन लोखंडी दरवाजाचे कुलूप तोडले. आत प्रवेश केल्यानंतर खाली असलेल्या स्टोअर रुमच्या दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. येथे असलेले १६० किलो वजनाचे २८ नगर, लोखंडी पट्ट्याचे केज वायर, साडेसात हॉर्स पॉवरच्या दोन विद्युत मोटारी, पंधरा किलो वजनाच्या वायरसह एकूण ४९ हजार ३०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी भरतीया यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला. रविवारी पोलिस अधीक्षक ज्योतिप्रियासिंह, उपविभागीय अधिकारी दीक्षितकुमार गेडाम, पोलिस निरीक्षक योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोउपनि मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी आरोपीस गजाआड केले. त्याच्याकडून आणखी चोऱ्या उघडकीस येण्याची शक्यता आहे.