शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
3
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
4
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
5
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
6
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
7
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
8
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
9
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
10
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
11
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
12
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
13
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
14
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
15
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
16
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
17
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
18
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
19
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
20
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
Daily Top 2Weekly Top 5

शहराच्या मध्यवर्ती भागातील हॉटेल मध्ये चोरी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2017 19:03 IST

शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपूरा येथील इंद्राली हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही चोरी गणेशोत्सवादरम्यान घडली.  

औरंगाबाद, दि.3 : शहराच्या मध्यभागी असलेल्या औरंगपूरा येथील इंद्राली हॉटेलवर मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी डल्ला मारल्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे ही चोरी गणेशोत्सवादरम्यान घडली.  चोरट्यांनी हॉटेलमधून रोख  16 हजार व सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे डीव्हीआर साहित्य असा जवळपास 30 हजारांचा ऐवज चोरला. या प्रकरणी सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, किशोर राजू शेट्टी (रा. बन्सीलाल नगर) यांचे औरंगपूरा परिसरात  इंद्राली हॉटेल आहे. त्यांनी नेहमी प्रमाणे शनिवार रोजी रात्री 12 वाजता हॉटेल बंद करून घरी गेले. दोन दिवस बॅक बंद असल्याने हॉटेल मधे आलेले दिवसभरातील 15 ते 16 हजार रूपये रक्कम गल्यातच  ठेवले होते. रविवार रोजी सकाळी दुध देण्यासाठी दुधवाला आला असता हॉटेल मध्ये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. त्याने तात्काळ घटनेची माहिती हॉटेल मालक किशोर शेट्टी यांना फोनद्वारे दिली. किशोर शेट्टी यांनी तात्काळ हॉटेल वर येत हॉटेलची पाहणी केली असता, रोख रक्कमेसह सीसीटीव्हीचे डीव्हीआर चोरीला गेल्याचे समजले. किशोर यांनी घटनेची माहिती सिटीचौक पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनेची माहिती मिळताच  सहाय्यक पोलिस निरीक्षक हेमंत कदम व पोलिस कर्मचार्‍यांनी घटना स्थळाची पाहणी केली.